रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

कोकणात गणपतीला
रेल्वेकडून विशेष ३० फेऱ्या
रत्नागिरी : पश्चिम रेल्वेमार्गावर यंदा मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी अशी विशेष गाडी धावणार आहे. गणेशोत्सवानिमित्त या गाडीच्या तीस फेऱ्यांची घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित स्वरूपात गाडी सुरू करावी, अशी या मार्गावरील प्रवासी वर्गाकडून तसेच मुंबईतील प्रवासी संघटनांकडून केली जात होती. याची दखल घेत कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी हा मुद्दा नुकत्याच झालेल्या मडगाव येथील बैठकीत उपस्थित केला होता. या गाडीची मागणी केली होती. आता या गाडीची घोषणा झाली असून यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल सचिन वहाळकर यांनी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेचे आभार मानले.

फोटो ओळी
-rat२५p२०.jpg-M१८७८० रत्नागिरी : लोकनेते राजाभाऊ लिमये यांचा सत्कार करताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत डावीकडून सचिन करमरकर, राजन शेट्ये, राहुल पंडित.

राजाभाऊ लिमये यांची मंत्री सामंतांनी घेतली भेट
रत्नागिरी : उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वसंत विष्णू उर्फ राजाभाऊ लिमये यांची सदिच्छा भेट घेतली. राजाभाऊंचा ८७ वा वाढदिवस आदल्या दिवशीच साजरा झाला. त्यानिमित्त मंत्री सामंत यांनी राजाभाऊंच्या घरी जाऊन शाल आणि पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजाभाऊ लिमये यांचे रत्नागिरीसाठी मोठे योगदान असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी नगरसेवक राजन शेट्ये, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर उपस्थित होते.

डॉ. पानवलकर स्मृती काव्यलेखन स्पर्धा
रत्नागिरी : मारुती मंदिर येथील विमलाताई पटवर्धन शहर वाचनालयातर्फे वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंद पानवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ३० जुलैपर्यंत वाचनालयात कवींनी दोन कविता आणून द्याव्यात, असे आवाहन केले आहे. रत्नागिरी आणि परिसरातील कवींसाठी ‘योग्य मतदान लोकशाहीचा प्राण, प्रदूषणमक्त जगासाठी, मी, माझे कुटुंब आणि जग तसेच सुंदर माझी वसुंधरा’ या चार विषयांवर कविता लिहायच्या आहेत.
विषयप्रधान जनजागृती आणि कृतिप्राधान्यता या दृष्टिकोनातून कवींनी आपल्या दोन कविता येत्या ३० जुलैपर्यंत वाचनालयात आणून द्याव्यात. सोबत पूर्ण पत्ता, मोबाइल नंबरही द्यावा. वाचनालयाची कार्यालयीन वेळ सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी साडेतीन ते सात ही आहे. स्पर्धेत तीन विजेते क्रमांक काढण्यात येणार आहेत. बक्षीसपात्र कवींसह काव्यवाचन सादर करण्याची संधीही देण्यात येईल. हा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती अध्यक्षा मोहिनी पटवर्धन, सचिव अॅड. मिलिंद पिलणकर आणि स्पर्धा संयोजक सौ. शिल्पा पानवलकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com