रत्नागिरी ः खरीप हंगाम 1 रुपयात पिकविमा योजना

रत्नागिरी ः खरीप हंगाम 1 रुपयात पिकविमा योजना

Published on

एक रुपयात पिकविमा योजना
जिल्हाधिकारी देवेंदर सिंह; ३१ जुलैपर्यंत अखेरची मुदत
रत्नागिरी, ता. २६ ः शासनामार्फत खरीप हंगाम २०२३ मध्ये केवळ १ रुपया प्रतिअर्ज या दराने सर्वसमावेशक पिकविमा योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे. केवळ एक रुपया भरून यामध्ये सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये नाचणी व भात या दोन पिकांचा या योजनेमध्ये समावेश होतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात भातशेतीचे क्षेत्र ७९ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ६८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भात उत्पादन घेणारे शेतकरी आहेत तर १० हजार ३९८ हे हेक्टर क्षेत्रावर नाचणी घेत असलेले शेतकरी आहेत. ते या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकर्‍यांना सातबारा उतारा, ८ अ, आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत व पीक पेराबाबत स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. ही कागदपत्रे घेऊन जवळच्या सामान्य सुविधा केंद्रावर जाऊन एक रुपयामध्ये आपला पिकविमा उतरवू शकतात. या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.
जोखमीच्या हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामात हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, पीकपेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग पडल्यास भरपाई मिळणार आदी कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा मिळणार आहे.
जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही विमा कंपनी नियुक्त केली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे, असे सिंह यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.