ःखेर्डीत ठाकरे शिवसेना स्वबळावर लढणार

ःखेर्डीत ठाकरे शिवसेना स्वबळावर लढणार

ratchl२५४.jpg
१८७८३
चिपळूणः नवनिर्वाचित विभागप्रमुख बाबू शिर्के यांचा सत्कार करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी.
-----------------
खेर्डीत ठाकरे शिवसेना
स्वबळावर लढणार
बैठकीत निर्धार; गतवैभव परत मिळवण्याचा निर्धार
चिपळूण, ता. २६ः खेर्डीत शिवसेनेला नेहमीच सत्तेसाठी कोणाचा ना कोणाचा आधार घ्यावा लागला. मात्र यापुढे खेर्डी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी कोणत्याही पॅनेलच्या माध्यमातून लढायचे नाही. कोणाच्या कुबड्या न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वबळावर लढविण्याचा निर्धार खेर्डीतील शिवसैनिकांनी झालेल्या बैठकीत केला. शिवसेना ठाकरे गटाच्या खेर्डी विभागाची बैठक खेर्डी एमआयडीसीतील हॉटेल मिरा रिजन्सी येथे झाली. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
तालुक्यात खेर्डी ग्रामपंचायत एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. गेली १५ ते २० वर्षे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या गटाने ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व ठेवले आहे; मात्र खताते गटात फूट पडल्यानंतर दुफळी निर्माण झाली. शिवसेनेला ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी नेहमीच कोणाचा ना कोणाचा आधार घ्यावा लागला आहे; मात्र यापुढे कोणाच्याही कुबड्या न घेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या वेळी खेर्डी पंचायत समिती गणाच्या विभागप्रमुखपदी माजी उपसरपंच विजय शिर्के यांची निवड करण्यात आली. उपविभागप्रमुखपदी रमेश शिंदे, इक्बाल बेबल, शाखाप्रमुखपदी अनिल शिंदे, अनिल लांजेकर आणि मनोहर शिगवण यांची नियुक्ती करण्यात आली. उपशाखाप्रमुखपदी समीर कदम यांची वर्णी लागली. नवनियुक्त पदाधिकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीला तालुकाप्रमुख विनोद झगडे, प्रतापराव शिंदे, बाळा कदम, राकेश शिंदे, मानसी भोसले, उमेश खताते यांच्यासह शशी कासार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com