तहसीलदार पाठक यांचा
कुडाळात मनसेतर्फे सन्मान

तहसीलदार पाठक यांचा कुडाळात मनसेतर्फे सन्मान

Published on

18988
कुडाळ ः मनसेतर्फे तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी, दीपक गावडे आदींनी केला. (छायाचित्र ः अजय सावंत)

तहसीलदार पाठक यांचा
कुडाळात मनसेतर्फे सन्मान
कुडाळ, ता. २६ ः कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी पूरसदृश कालावधीत दिवसरात्र स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांसोबत आपत्ती नियंत्रण यंत्रणा राबवल्याबद्दल मनसेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
गेला आठवडाभर पावसाने कहर करत तालुक्याला झोडपून काढले. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी नुकसान झाले. प्रशासनाकडून आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर करण्यात आल्या. पूरसदृश भागातील जागरूक नागरिकांच्या सहयोगातून प्रशासन सतर्क व सक्रिय राहिले. तहसीलदार पाठक यांनी कार्यालयाच्या चार भिंतीत बसून केवळ आदेश न देता तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून ‘ऑन फिल्ड’ जागता पहारा देत तालुक्यात फिरून मदतकार्य केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांच्या सहकार्याने प्रशासकीय यंत्रणा यशस्वीरित्या हाताळल्याची दखल घेऊन मनसेनेच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी, दीपक गावडे, गुरू मर्गज, वैभव धुरी, इम्रान शेख आदी पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार पाठक यांचा सन्मान केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.