‘स्किल डेव्हलपमेंट’ अभ्यासक्रम स्तुत्य

‘स्किल डेव्हलपमेंट’ अभ्यासक्रम स्तुत्य

18990
कट्टा : बहुविध कौशल्य अभ्यासक्रम वर्गाचे उद्‍घाटन करताना कर्नल शिवानंद वराडकर. शेजारी उद्योजक दत्ता सामंत, अजयराज वराडकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, मुख्याध्यापक संजय नाईक आदी.

‘स्किल डेव्हलपमेंट’ अभ्यासक्रम स्तुत्य

दत्ता सामंत; कट्टा येथे अभिनव उपक्रमाचे उद्‍घाटन

ओरोस, ता. २६ ः शिक्षण घेण्याचा कालावधी आयुष्यात महत्त्वाचा असतो. ही सुरुवातीची दहा वर्षे तन-मन-धन अर्पून एकनिष्ठेने अभ्यास केल्यास उच्च पदस्थ होऊन यशस्वी जीवन जगू शकता. स्किल डेव्हलपमेंटसारखा कोर्स आठवीपासूनच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत यांनी बोलताना केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, कट्टा येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉस टू कनेक्ट’ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘बहुविध कौशल्य अभ्यासक्रम’ उपक्रमाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. २५) उद्योजक सामंत यांच्या हस्ते झाले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्‍घाटन सोहळा झाला. व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध बनसोड, खगोल अभ्यासक महेश नाईक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, रवींद्रनाथ पावसकर, संचालक महेश वाईरकर, स्वाती वराडकर, सर्जेराव पाटील, सुनील गुराम, जयंद्रथ परब, सुरेश कदम, मुख्याध्यापक संजय नाईक, ऋषी नाईक, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी देशसेवक कर्नल वराडकर यांचा कट्टा पंचक्रोशीला अभिमान असल्याचे सांगत संस्थेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. संजय पेंडूरकर, वीणा शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. देवयानी गावडे यांनी आभार मानले.
...............
चौकट
विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
काळाची गरज ओळखून ‘एकच शिक्षण तंत्रशिक्षण’ हे ब्रीद ठेवून आजपासून वराडकर हायस्कूलमध्ये आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक, ॲग्री, फूड प्रोसेसिंग या चार कोर्समधून फॅब्रिकेशन, वेल्डींग, सोल्डरींग, थ्रेडींग, बांधकाम, सुतारकाम, इलेक्ट्रिकल, सर्वेक्षण, एनर्जी, शेतीविषयक तंत्रज्ञान, शेती संबंधित प्राणीशास्त्र, कुकींग, आरोग्य, शिवणकाम, विणकाम याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत. आठवड्यातून एक दिवस तीन तास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे संस्थाध्यक्ष वराडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com