रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख- 1

रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख- 1

१९ (रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख - १)

rat२६p६.jpg ः
२३M१८९७५
खेड ः हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनाच्या परिसरातील शिवसेना नेते रामदासभाई कदम सोबत आमदार योगेश कदम यांची टिपलेली छबी.
rat२६p७.jpg ः
२३M१८९७६
निसर्ग चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप करताना शिवसेना नेते रामदासभाई कदम सोबत आमदार योगेश कदम व पदाधिकारी.
rat२६p८.jpg ः
२३M१८९५८
तौक्ते चक्रीवादळानंतर दापोली विधानसभा मतदार संघातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी करताना शिवसेना नेते रामदास कदम सोबत पदाधिकारी.
rat२६p१२.jpg ः
२३M१८९७९
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी धनादेश देताना रामदासभाई कदम सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन किर्तीकर सोबत अन्य पदाधिकारी.

--

महाराष्ट्राच्या राजकारणात उच्च स्तरावर पोहचूनही आपल्या मातीला न विसणारे माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम हे दुर्मिळ व्यक्तीमत्व. शुन्यातून स्वबळावर प्रतिसृष्टीच निर्माण करणारे भाई आपल्या अशा दुर्मिळ गुणांमुळेच लोकप्रियतेचे उच्चांक गाठणारे नेते ठरले. आपल्या कार्याने शिवसैनिक, शाखाप्रमुख, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते पदापासून पर्यावरण मंत्रिपद लिलया पेलत महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त ठेवण्याची किमया करणारे भाई रयतेचे खरे आधारवड ठरले आहेत. साऱ्‍यांच्याच आदरास पात्र ठरलेले तमाम जनतेचे लाडके नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांचा आज २७ जुलैला वाढदिवस, त्या निमित्ताने घेतलेला मागोवा....!

- रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण, (दस्तुरी, ता. खेड)

---

रयतेचा आधारवड रामदासभाई कदम

प्रखरता, नेतृत्व, दृढता, निर्भयता, तेजस्विता हे गुण नसानसात असणाऱ्‍या भाईंनी राजकीय क्षेत्रात केलेले कामगिरी, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली गरूडझेप वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या सर्वंकष कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानाचे स्थान आहे. खेडवासियांसह राज्यातील जनतेच्या मनात भाईंनी जे अढळस्थान मिळवले आहे तशी भाईंची आणि माझी मैत्रीही जुनीच आहे. त्यांच्या राजकीय कारर्किदीचे अनेक चढउतार मी जवळून पाहिले आहेत. राजकीय जीवनात कितीही चढ-उतार आले तरी भाई कधीच खचले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला असून, त्या प्रयत्नात ते यशस्वी झालेले मी पाहिले आहे. समाजहितासाठी सदैव दक्ष राहणं आणि समाजातील माणसांची कदर करणं, समाजधुरिणांना सन्मानपूर्वक वागवणं असा समाजकारणातील मुलमंत्र देणारे भाई प्रत्येक कुटुंबाचा एक सदस्यच बनले आहेत. घराण्यात राजकीय गंध नसतानादेखील खडतर प्रवासातून राजकारणातील एकेक शिखरे पादाक्रांत करत आदर्श शिवसैनिक, उत्तम लोकप्रतिनिधी कसा होऊ शकतो? हे भाईंनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. केवळ कोकणातच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्‍यात भाईंची प्रतिमा आहे. नेतृत्वात बाणेदारपणा अन् विचारात प्रगल्भता असणाऱ्‍या भाईंनी राजकीय प्रवासात सदैव जनतेचे अश्रू पुसण्याची सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. हाच ठेवा सर्वसामान्यांच्या हृदयात आजमितीसही कायम आहे. आपण ज्या समाजात जन्माला आले त्याचे ऋण मानून समाजामध्ये लोकांविषयी जिव्हाळा, कळकळ व तळमळ असावी लागते. सामाजिक कार्यासाठी आवश्यक असलेली तळमळ आणि निष्ठा भाईंमध्ये पदोपदी जाणवते. अथकपणे गोरगरिब, दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहणारे, त्यांच्या आयुष्यात भव्यदिव्य स्वप्न पाहण्याची व या स्वप्नांची स्वप्नपूर्ती घडवण्यासाठी अविश्रांतपणे झगडण्याची दैवी देणगी त्यांना लाभली आहे. सतत कार्यमग्न राहणे, जनतेच्या समस्या या स्वतःच्या समस्या समजून सोडवण्यासाठी प्रसंगी तहानभूक विसरणारे भाई सर्वसामान्यांना आधार वाटतात. भाईंचा धाडसीपणा, निर्णय घेण्याची क्षमता, गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची तळमळ व शिवसेनेवर असणारी अढळ श्रद्धा यामुळेच तळागाळातील जनता त्यांचे चाहते होऊन त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात मानाचे अन् मोलाचे स्थान मिळवले आहे. कोणतीही गोष्ट सचोटीने, निष्ठेने केली अन् श्रद्धा व सबुरी या साईबाबांच्या मंत्रावर विश्‍वास ठेवला तर फळ निश्‍चितच मिळते. असा जणू मंत्र भाईंनी आपल्या साईबाबांच्या अपार भक्तीतून दिला आहे. केवळ समोरच्या माणसावर भाईंचं प्रेम असतं असं नाही. त्यांच्या पालखी बंगल्यावर असलेल्या श्‍वानांवर भाईंचा विलक्षण जीव आहे. माणसांची कितीही गर्दी असली तरी ते श्‍वान भाईंवरचा आपला हक्क सोडत नाहीत. एवढ्या गर्दीतही ते भाईंच्या पाठीशी कायम असतात. कोटेश्‍वरी देवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या जामगे गावच्या रामदासभाईंनी राजकीय पटलावर उत्तुंग झेप घेताना विकासाचे चक्रच अविरतपणे फिरते ठेवले आहे. राज्यातील आबालवृद्धांना आपलेसे वाटणारे, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्‍या भाईंनी जिल्ह्यातील बेरोजगारांसह तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने पावलेही टाकली आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणालाच प्राधान्य देत समाजकारणाच्या माध्यमातून जनतेचे हृदयसिहांसन काबिज करून जनसामान्यांमध्ये मानाचे स्थान मिळवणाऱ्‍या अन् स्वकर्तृत्वावर उंची गाठूनही सर्वसामान्य कार्यकर्त्यांला न विसणाऱ्‍या भाईंचा कार्यरूपी अश्‍वमेध असाच उधळत राहो, हीच वाढदिनी सदिच्छा !!!

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com