रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख - 2

रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख - 2

Published on

२० (रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख - २)

कोकणचे नेते रामदासभाई कदम वाढदिवस विशेष------------डोकं

rat२६p९.jpg, rat२६p१०.jpg ः
२३M१८९५९, २३M१८९७७
संभाजीनगर आणि नादेंड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना तत्कालीन पालकमंत्री आणि रामदासभाई कदम सोबत पदाधिकारी.

rat२६p११.jpg ः
२३M१८९७८
दापोली विधानसभा मतदार संघातील विकासकामाचे भूमिपूजन करताना शिवसेना नेते रामदासभाई कदम. सोबत आमदार योगेश कदम व पदाधिकारी.

rat२६p१३.jpg ः
२३M१९०५२
एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी कदम सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. सोबत नितीन बानगुडेपाटील व पदाधिकारी.

rat२६p२८.jpg-
२३M१९०१५
रामदास कदम

rat२६p४०.jpg ः
२३M१९०५३
रामदास कदम

rat२६p४१.jpg ः
२३M१९०५४
रामदास कदम

-----

खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र रामदास कदम यांचा जन्मदिवस २७ जुलै, हा तालुक्याचा भाग्योदयच म्हणावा लागेल. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घराण्यात रामदासभार्इंचा जन्म झाला. त्यांचा महत्वाकांक्षी स्वभाव राजकीय पटलावरील किती पाने उलगडेल, याची पुसटशीदेखील कल्पना त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या सहकाऱ्यांनाही नव्हती. लहानपण गावात खेळण्या-बागडण्यात गेल्यानंतर मुंबईतील कांदिवली-हनुमाननगर येथे शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून रामदासभार्इंनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. अन्यायाविरुद्ध लढून सामाजिक हितासाठी आक्रमक व भिडणारा कार्यकर्ता म्हणून सर्वत्र त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या कुशल व्यक्तिमत्वाची कामगिरी जाणून खुद्द शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर खेड तालुक्याची जबाबदारी सोपवली. १९९० च्या निवडणुकीत आमदारकी संपादन केल्यानंतर त्यांनी खेड तालुक्याच्या पंचायत समितीवर भगवा फडकवला. तालुक्याचा विकास करताना तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेत रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकावून आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर १९९५च्या विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन केला. त्याचवेळी शिवसेना-भाजपची सत्ता राज्यात आली आणि रामदास कदम यांना सुरवातीला अन्न व नागरी पुरवठामंत्री व नंतर गृहराज्य मंत्रिपद देण्यात आले.
खेड तालुक्यात त्यांच्या रूपाने विकासकामांचा एकतर्फी प्रवाहच येत होता. तालुक्यात वाडीवस्तीवर रस्ते, वीज व नळपाणी योजना यांसारख्या सुविधा पोहोचवून भार्इंनी थोरा-मोठ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. भाईंचा कोकणातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील दरारा आजही कायम आहे. अशा या सर्वकालीन खंबीर नेतृत्वाच्या कारकिर्दीवर वाढदिवसानिमित्त टाकलेला प्रकाश.....!

- दिनेश शर्मा, उद्योजक, लोटे औद्योगिक वसाहत

---

सर्वकालीन खंबीर नेतृत्व ः रामदासभार्इ कदम


विकासकामांचा ध्यास असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पक्षाच्या पडत्या काळातही पक्षासोबत राहून पक्षनिष्ठा म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. ही जबाबदारी पेलवताना काही वेळेला कठोर निर्णय घेण्याचे धाडसदेखील ते करत. एखादा निर्णय समाजहिताचा असेल तर तो घेताना त्यांनी मागे कधीच पाहिले नाही. खेड-दापोली-मंडणगड या विधानसभा मतदार संघात विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या रूपाने या मतदार संघात विकासाची गंगा अवतरली आहे. पर्यावरणमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी पर्यावरणाला बाधक असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेकांनी विरोध केला. या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटला; मात्र, एकदा एक निर्णय घेतला की, त्याची पूर्तता करणे आणि तो तत्काळ अंमलात आणणे हीच त्यांची कामाची पद्धत आहे. पर्यावरण वाचवले पाहिजे, अशी केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याची कामगिरी रामदासभाई यांनी पर्यावरणमंत्री म्हणून केली. राज्यातून संपूर्ण प्लास्टिक हद्दपार करण्याचा त्यांनी जणू विडा उचलला होता.
विकासकामांच्या धडाक्यामुळे संपूर्ण तालुक्यात शिवसेनेचे जाळे अधिक घट्ट होत गेले. हीच कार्यकर्त्यांची वीण अगदी घट्ट बांधून भार्इंनी १९९९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येत आमदारकीची हॅट्ट्रिकच पूर्ण केली. रस्ते, पाणी, वीज, शाळा, दवाखाने, रोजगार, साकव, वृद्धाश्रम, मेडिकल कॉलेज अशा विविधांगी गोष्टींतून भार्इंनी आपला दूरदृष्टिकोन सिद्ध केला. शिवतेज आरोग्यसेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खेड-भरणेनाका येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांचे तालुक्यातील चिरणी, कासई व शिवतर येथे स्मारक उभे केले. याच संस्थेच्या माध्यमातून कोकणातील पहिला ‘मिनी ऑलिम्पिक’ जलतरण तलाव तयार केला. कोकणातील पहिले व अद्ययावत दंत महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या योगिता दंत महाविद्यालयाची निर्मिती केली. जिल्ह्यातील मुलांना सैनिकी प्रशिक्षण मिळावे, देशाला नवोदित जवान मिळावेत यासाठी ‘छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल''ची स्थापना केली. सामाजिक क्षेत्रात विविध कामे करताना खेड म्हणजे रामदासभाई असे समीकरण झालेल्या भार्इंनी पुन्हा २००४ ला विधानसभेत आमदारकी मिळवली.
सन २००९ ला खेड मतदार संघाचे विभाजन झाल्यावर गुहागर विधानसभा मतदार संघात माजी आमदार डॉ. विनय नातू व तत्कालीन राज्यमंत्री व आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर अटीतटीची झुंज देताना त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला; मात्र, त्यानंतरही पक्ष प्रमुखांनी राजकीय क्षेत्रातील भाईंचे महत्व ओळखून विधानपरिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून विधानपरिषदेची आमदारकी मिळवली व आपले अस्तित्व सिद्ध केले. तालुक्यातील जुन्या-नवीन लोकांना बरोबर घेऊन त्यांनी पुन्हा वेगाने कामाला सुरवात केली. रामदासभार्इंशिवाय दापोली-खेडला पर्याय नाही, असा एक दबका आवाज खेडवासियांच्या ओठांवर तरळत होता. त्यामुळे सन २०१२पासून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण कोकणात रामदासभार्इंचा झंझावात सुरू झाला. भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे पर्यावरणमंत्री व संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून रामदासभाई सक्रिय झाले. संपूर्ण राज्याची धुरा सांभाळत असताना त्यांनी आपल्या जन्मभूमीशी नाळ कायम ठेवली आहे. त्यांनी खेड-दापोली-मंडणगड या तीनही तालुक्यांमध्ये विविध कामांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली आहे. रामदास कदम यांनी हजारो कोटींची विकासकामे दापोली-खेड-मंडणगड मतदार संघात आणली आहेत. गेल्या २५ वर्षात दापोली-मंडणगड या दोन तालुक्यांनी विकास काय असतो? हे कधी पाहिलेच नव्हते. ते रामदास कदम यांच्यामुळे पाहणे शक्य झाले आहे.
दापोली-खेड-मंडणगड विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा झंझावात सुरू असून, या विकासकामांचे श्रेय शिवसेना नेते राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांना निर्विवादपणे जायला हवे. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. या सरकारमधील ज्येष्ठ व वजनदार मंत्री म्हणून रामदासभार्इंकडे पाहिले जाते. कोणत्याही खात्याचे काम असो, माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई सत्ताधारी सरकारमधील मंत्री या नात्याने दापोली विधानसभा क्षेत्रातील विकासकामे मंजूर करून घेत आहेत. गेली अनेक वर्षे या मतदार संघातील प्रलंबित राहिलेली विकासकामे मंजूर करून घेऊन ती मार्गी लावत रामदासभार्इंनी दापोली विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणली आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून रामदासभाईंनी मराठवाडा, विदर्भ या ठिकाणीही कृषी क्षेत्रासाठी मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला विहीर देण्याचे काम शिवसेना पक्षाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. पक्षाचा हा कार्यक्रम रामदास कदम यांनी नियोजनबद्धरित्या पार पाडला. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत, त्या शेतकऱ्यांची मुले-मुली यांचे विवाहदेखील रामदास कदम यांनी सेनेच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने करून दिले. या वेळी ‘त्या’ नवदाम्पत्यांना दागिन्यांसह, संपूर्ण वऱ्हाडी मंडळींच्या खर्चासह संपूर्ण संसाराचे साहित्य शिवसेनेच्या माध्यमातून देऊन भार्इंनी त्यांना मदतीचा हात दिला. गेली तीन दशके राजकारणासह, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात चमकणाऱ्या या ताऱ्याच्या राजकीय कर्तृत्वाच्या कक्षा अशाच विस्तीर्ण होवोत. त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे हे व्रत आणखीनच बहरत जावो. त्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट होवोत, त्यांच्या प्रगतीला असाच उत्तरोत्तर बहर येवो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.