सहा गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन

सहा गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन

Published on

१२ ( पान ३ साठी )

rat२६p६४.jpg ः
२३M१९१३६
राजापूर ः धोपेश्‍वर येथील दरडग्रस्तांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि अधिकारी

सहा गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन

लांजा,राजापूर तालुका ; स्थलांतरित होण्याच्या नोटिसा


राजापूर, ता. २६ ः रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे कायमस्वरूपी योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रत्येकी तीन अशा सहा गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव शासनाला लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आज तालुका दौऱ्‍यावर आले होते. प्रांत कार्यालयामध्ये पूरस्थिती आणि दरडग्रस्त आणि पूरप्रवणग्रस्त गावांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी, प्रांताधिकारी वैशाली माने, राजापूरचे तहसीलदार शीतल जाधव, लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विवेक गुंड, जलसंपदा विभागाचे अंबोळे आदी उपस्थित होते.
या वेळी सिंह म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनी आपल्याशी संवाद साधून जिल्ह्यातील पूरस्थिती आणि भूस्खलन आदींसंबंधित सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी काही दरडग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असून त्यामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रत्येकी ३ अशा सहा दरडग्रस्त गावांचा समावेश आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, संभाव्य दरडग्रस्त गावांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या असून काही कुटुंबांचे स्थलांतरही करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी सिंह यांनी राजापुरातील धोपेश्वर गावातील दरडप्रवण खंडेवाडी, गुरववाडी व नाडणकरवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
--------------------
या गावांचे होणार पुनर्वसन

राजापूर ः धोपेश्‍वर-खंडेवाडी, वडदहसोळ हळदीची फांदी, परूळे पाटीलवाडी
लांजा ः खोरनिनको-मुसळेवाडी, इंदवटी बाईतवाडी, वनगुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.