रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य

रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य

Published on

19146
सावंतवाडी ः येथील उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप माजी नगराध्यक्ष संजू परब. सोबत इतर.


रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य
करणार ः सुनील राऊळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय मदत करता येईल का? यासाठी आपले प्रयत्न राहतील. रुग्णालयातील सर्व रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सैनिक पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर व सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री फाउंडेशनचा मान्सून महोत्सवाचा निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप माजी नगराध्यक्ष संजू परब व फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सावंत, फाउंडेशनचे कार्यवाहक ॲड संतोष सावंत, सचिव प्रताप परब, माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे, माजी सचिव सुहास सावंत, हर्षवर्धन धारणकर, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, खजिनदार गजानन बांदेकर, आंबोली सैनिक स्कूलचे अधिकारी दीपक राऊळ, कलंबिस्त दुग्धविकास संस्थेचे संचालक तथा माजी पोलीस पाटील दत्ताराम कदम आदी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यदृष्ट्या काय सुविधा आहेत? काय सुविधा करायला हव्यात? यासंदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने डॉ. सावंत यांच्याकडून माहिती करून घेतली. यावेळी ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या. त्यांना जी काही सहकार्य मदत करता येईल ती आमच्या माध्यमातून केले जाईल, असे श्री. परब यांनी स्पष्ट केले. यावेळी रुग्णांशी संवादही साधण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.