मुलांमधील विशिष्ट क्षमता ओळखा

मुलांमधील विशिष्ट क्षमता ओळखा

Published on

swt3021.jpg
19996
आडाळी : शैक्षणिक कार्यशाळेत डॉ. रुपेश पाटकर यांनी पालकांशी संवाद साधला. सोबत पराग गावकर, सायली देसाई आदी.

मुलांमधील विशिष्ट क्षमता ओळखा
डॉ. रुपेश पाटकरः आडाळीत शैक्षणिक कार्यशाळेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. ३१ : मुलांमधील क्षमता ओळखण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शिक्षणाचा उपयोग मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी व्हावा, असे मत मनोविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी मांडले.
ग्लोब ट्रस्ट, आडाळी आणि प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आडाळी प्राथमिक शाळेत ''आजच्या मुलांचा अभ्यास आणि पालकांची जबाबदारी'' या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. तीसहून अधिक पालक कार्यशाळेत सहभागी झाले. डॉ. पाटकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा सरपंच पराग गावकर, मुख्याध्यापक सायली देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेघा गावकर, उपाध्यक्ष आरती गावकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका गावकर, विशाखा गावकर, अमोल परब, निशा गावकर, माजी सरपंच नीळकंठ गावकर, ग्रामपंचायत माजी सदस्य विशाखा गावकर आदी उपस्थित होते. मुलांच्या बदललेल्या अभ्यास पद्धतीनुसार पालकांच्या प्रबोधनासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ. पाटकर म्हणाले, ''शिक्षणासाठी मातृभाषा हेच माध्यम प्रभावी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहॆ. संकल्पना स्पष्ट होणे, हा शिक्षणाचा उद्देश असतो. मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शिवाय भावनिक बुद्धिमत्ता जपणे, हे आजचे आव्हान आहॆ. त्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक भावनिकतेचा संस्कार करायला हवा. सरधोपटपणे मुलांकडे न पाहता त्यांच्यातील विशिष्ट क्षमतांचा शोध घ्यायला हवा."
पराग गावकर प्रास्ताविकात म्हणाले, "मुलांवरचे संस्कार हे जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहेत. पूर्वी सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांवर संस्कार होत असत; मात्र आता पालकांना सद्यस्थितीचे आकलन करून संस्कार करावे लागतील. त्यासाठीच ही कार्यशाळा आहॆ." यावेळी गावकर यांनी पालक व मुलांसाठी दरमहिन्याला एक कार्यशाळा होणार असल्याचे सांगितले. सौ. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष उदय गावकर, दीपिका सावंत यांनी रानफुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com