असलदे विकास सोसायटीचा 
शंभर टक्के वसुलीमुळे गौरव

असलदे विकास सोसायटीचा शंभर टक्के वसुलीमुळे गौरव

20073
सिंधुदुर्गनगरी : येथील कार्यक्रमात जिल्‍हा बॅंकेचे संचालक महेश सारंग यांनी असलदे विकास सोसायटीचे अध्यक्ष भगवान लोके यांचा सत्‍कार केला. यावेळी आमदार नीतेश राणे, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी.

असलदे विकास सोसायटीचा
शंभर टक्के वसुलीमुळे गौरव

जिल्हा बँकेतर्फे सिंधुदुर्गनगरीत सन्मान

कणकवली, ता. ३१ : जिल्ह्यातील शंभर टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये असलदे सोसायटीची निवड झाली. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने असलदे संस्थेचा सिंधुदुर्गनगरी येथे गौरव करण्यात आला.
जिल्‍हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते असलदे संस्थेचे अध्यक्ष भगवान लोके यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, १५ हजार रुपये बक्षीस रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्‍हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक आमदार नीतेश राणे आदी उपस्थित होते. यावेळी बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, व्हिक्टर डाटन्स, सुशांत नाईक आदींसह मान्यवर उपस्थित होते. सोसायटीचे उपाध्यक्ष दयानंद हडकर, संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, उदय परब, शाम परब, विठ्ठल खरात, प्रकाश खरात, कांचन लोके, अनंत तांबे, संतोष परब, सनीता नरे, सचिव अजय गोसावी, संदीप नरे आदींनी सन्मान स्वीकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com