उद्योजक बना

उद्योजक बना

उद्योजक बनून रोजगार निर्मिती करा

डॉ. संजय भावे ; उद्यानविद्या महाविद्यालयाचा वर्धापन दिन

दाभोळ, ता.३१ ः दापोली येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांनी उद्यानविद्या विषयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात न राहता स्वतः उद्योजक होऊन इतरांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले.
कोकणातील हवामान विविध फळे, भाजीपाला, फुले इत्यादींसाठी अनुकूल असल्याने या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने रोजगार निर्मितीस प्रचंड वाव असल्याचे डॉ. भावे यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, कुलसचिव डॉ. भरत साळवी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत शहारे, डॉ. चंद्रकांत पवार, स्मिता पवार, विद्यार्थी प्रतिनिधी, विशाल केळसकर उपस्थित होते.
या वेळी महाविद्यालयामार्फत भरवण्यात आलेल्या उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. भावे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहयोगी अधिष्ठाता यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालय प्रगतीचा सविस्तार आढावा घेतला. डॉ. भरत साळवी, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. प्रशांत शहरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मागील वर्षात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या डॉ. पराग हळदणकर, डॉ. प्रदीप हळदवणेकर, डॉ. राकेश गजभिये, डॉ. महेश कुळकर्णी व डॉ. सुमेद थोरात या प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आशिष भुवड, डॉ. आशिष घोरमाडे, डॉ. नगमा सुर्वे, आत्माराम सावंत, संदीप गरांडे, विशाल केळसकर, रक्षिता निकम, डॉ. नेहा दळी, तेजस पवार, ऋतुजा पवार, सूरज खेडेकर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com