माड़खोल फार्मसीमध्ये नेहा तंबिटकर प्रथम

माड़खोल फार्मसीमध्ये नेहा तंबिटकर प्रथम

swt३११०.jpg
M२०१२९
नेहा तंबिटकर, समीक्षा पवार, विनायक पडये, क्रांती गावकर, धनश्री परब

माड़खोल फार्मसीमध्ये
नेहा तंबिटकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ः शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलचा बी.फार्मसी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल ९५ टक्के लागला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक कामगिरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने निकाल संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अंतिम वर्षात नेहा तंबिटकर (८८.०३) हिने प्रथम, समीक्षा पवार (८२.०८) व विनायक पडये (८२.०८) यांनी द्वितीय, तर क्रांती गावकर (८२.०१) व धनश्री परब (८२.०१) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल महाविद्यालयाचे तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, परीक्षा विभाग प्रमुख मनाली वैद्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com