राजापूर-वाढीव छप्परपट्टीविरोधात व्यापाऱ्यांच्या लेखी हरकती

राजापूर-वाढीव छप्परपट्टीविरोधात व्यापाऱ्यांच्या लेखी हरकती

फोटो ओळी
-rat३१p२७.jpg ःKOP२३M२०१५२ राजापूर ः मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना निवेदन देताना राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, पदाधिकारी आणि व्यापारी. या वेळी उपस्थित पालिकेचे मुख्यलिपीक जितेंद्र जाधव.


वाढीव छप्परपट्टीविरोधात
व्यापाऱ्यांच्या लेखी हरकती

राजापूरच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः कोरोना महामारीतील आर्थिक नुकसानीच्या तडाख्याच्या संकटातून बाजारपेठेतील छोटे-मोठे व्यापारी स्थिरस्थावर होत आहेत. त्यांना सातत्याने राहत असलेल्या पूरस्थितीसह अन्य विविध समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नव्या करप्रणालीप्रमाणे दैनंदिन छप्परपट्टी कर आकारणी न करता पूर्वीप्रमाणे छप्परपट्टी आकारणी करावी, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघासह शहरातील व्यापाऱ्यांनी पालिकेकडे केली आहे. या वेळी नव्या करप्रणालीबाबत व्यापाऱ्यांनी लेखी हरकतीही पालिका प्रशासनाकडे दाखल केल्या आहेत.
याबाबतचे निवेदन राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापाऱ्यांनी आज मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना दिले. या वेळी व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक दिनानाथ कोळवणकर, राजेंद्र नवाळे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, माजी नगरसेवक अभय मेळेकर, सुलतान ठाकूर, प्रदीप कोळेकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रकाश कातकर, विवेक गादीकर, राजापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अनिल ठाकूरदेसाई यांच्यासह नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
अनधिकृत छप्परपट्टीला पायबंद बसताना पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने शासनाच्या सुचनेप्रमाणे दैनंदिन छप्परपट्टी आकारणी केली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी चर्चा करताना दिली. या संबंधित व्यापारीसंघाच्या शिष्टमंडळासोबत लवकरच बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगर पालिकेकडून बाजारपेठेतील व्यावसायिकांकडून आकारण्यात येत असलेली छप्परपट्टीची यापूर्वी सहामाही किंवा वार्षिक आकारणी केली जात होती. मात्र, आता पालिकेने नव्याने छप्परपट्टी कर आकारणी प्रणाली निश्‍चित केली असून त्यामध्ये व्यावसायिकांकडून दरदिवशी छप्परपट्टीची आकारणी केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही आकारणी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघाच्यावतीने संघाचे अध्यक्ष मालपेकर, कोळवणकर यांनी कर आकारणीबाबत व्यापारी संघासह व्यापार्‍यांची भूमिका सविस्तरपणे मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com