कावळेसाद पॉईंटवर होणार स्टॉलसाठी संकुल

कावळेसाद पॉईंटवर होणार स्टॉलसाठी संकुल

20164
गेळे ः कावळेसाद पॉईंटवर सर्व्हे करताना तहसीलदार श्रीधर पाटील व सहकारी.


कावळेसाद पॉईंटवर होणार स्टॉलसाठी संकुल

केसरकरांकडून प्रयत्न; सावंतवाडी तहसीलदारांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः कावळेसाद पॉईंट अनुभवण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गेळे येथील पर्यटनस्थळांवर येतात. त्या पर्यटकांना पायाभूत सुविधांची निर्मिती करून स्टॉलसाठी अद्ययावत संकुल उभारणीच्या दृष्टीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जाऊन स्टॉलचे सर्वेक्षण केले.
घाटमाथ्यावरील आंबोली, चौकुळ, गेळे या भागांतील पर्यटनाला नवीन लुक देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री केसरकर विचाराधीन आहेत. थंड हवेचे ठिकाण आणि प्रसिद्ध धबधब्यामुळे या भागात हजारो पर्यटक दरवर्षी येतात. त्या पर्यटकांना पायाभूत सुविधा प्राप्त हव्यात, यासाठी मंत्री केसरकर प्रयत्नशील आहेत. गेळे कावळेसाद पॉईंटजवळील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याचा देखील त्यांनी मनोदय व्यक्त केला. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज या स्टॉलचे सर्वेक्षण केले. या ठिकाणी २७ स्टॉल आहेत. शिक्षणमंत्री केसरकरांनी आपत्कालीन यंत्रणेच्या बैठकीमध्ये आढावा घेताना आंबोली, चौकुळ व गेळे येथील पावसाळी पर्यटनाला नवीन लुक देण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. गेळे येथील प्रसिद्ध कावळेसाद पॉईंट येथील स्टॉलधारकांचे अद्ययावत स्वरुपात पुनर्वसन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर तहसीलदार पाटील यांनी जाऊन स्टॉलचे सर्वेक्षण करावे, असे मंत्री केसरकर यांनी निर्देश दिले होते. देशीविदेशी पर्यटकांसह इतर पर्यटकही या ठिकाणी आल्यास त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि स्थानिक स्टॉलधारकांना अद्ययावत स्वरुपात स्टॉल चालविण्यासाठी उपलब्ध करून दिले जावेत, यासाठी केसरकर प्रयत्नशील आहेत.
---
पर्यटकांना पायाभूत सुविधा देणार
कावळेसाद या गेळेतील प्रसिद्ध पर्यटनस्थळी तहसीलदार पाटील दोन दिवसांपूर्वी पोहोचले. त्यांनी तेथील स्टॉलधारकांशी चर्चा केली. या ठिकाणी सध्या २७ स्टॉल उभे आहेत. यापूर्वी २५ स्टॉल होते. या स्टॉलधारकांचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करताना अद्ययावत स्वरुपात वास्तू उभारून पर्यटकांना आकर्षित करावे, असाही शासनाचा विचार आहे. यासाठी मंत्री केसरकर प्रयत्नशील आहेत. या स्टॉलधारकांचे नवीन जागेत पुनर्वसन करताना पर्यटकांना पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिली जाईल, असाही त्या मागचा हेतू आहे.
--
कोट
आंबोली कावळेसाद पॉईंट ठिकाणी सर्वेक्षण केले असता २७ स्टॉल आढळले. तेथील स्टॉलधारकांशी चर्चा केली व अडचणी समजून घेतल्या. या ठिकाणी ते पर्यटकांना वेगवेगळ्या पदार्थांची देवघेव करतात. कावळेसाद पॉईंटवर हजारो पर्यटक येत असतात.
- श्रीधर पाटील, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com