जिल्ह्यात ९१ पाणीसाठ्यांचे 
निर्जंतुकीकरण ः डॉ. कांबळे

जिल्ह्यात ९१ पाणीसाठ्यांचे निर्जंतुकीकरण ः डॉ. कांबळे

82167

जिल्ह्यात ९१ पाणीसाठ्यांचे
निर्जंतुकीकरण ः डॉ. कांबळे

पुरामुळे दूषित झाल्यामुळे खबरदारी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुराने दूषित झालेल्या ९१ पाणी साठ्यांचे निर्जंतुकीकरण करून पाणी पिण्यास योग्य असल्याबाबत खात्री करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी आज दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक पाणीसाठे दूषित झाले होते. आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करून पुरामुळे बाधित झालेल्या ९१ जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. बाधित पाणी साठ्यांचे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याबाबत ''ओटी'' परीक्षणाद्वारे खात्री करण्यात आली आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार, काविळ यासारखे जलजन्य आजार पसरू नयेत, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामधील ६४६ घरांतील २६४७ नागरिक पूरबाधित झाले होते. या ठिकाणी २९ आरोग्य पथके तैनात करून या पथकामार्फत दैनंदिन साथ सर्वेक्षण व पाणी साठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. कोठेही दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही तसेच जलजन्य आजार पसरू नये, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्भवणाऱ्या आजारांच्या प्रतिबंधक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित सर्वेक्षण व उपाययोजनेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.
...............
कोट
जिल्ह्यात पूरस्थितीमुळे दूषित पाणी होण्याची व जलजन्य आजार पसरण्याची भीती होती; मात्र आरोग्य यंत्रणेमार्फत वेळीच खबरदारीच्या उपाययोजना राबविल्याने तसेच आता पाऊस कमी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोठेही साथ रोगाचा उद्रेक नाही.
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com