झरेबांबर रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती

झरेबांबर रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती

swt3118.jpg
M20167
झरेबांबरः दुरवस्था झालेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविताना अनिल शेटकर, श्याम नाईक आदी.

झरेबांबर रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती
ग्रामस्थांचा पुढाकारः पर्यटक, प्रवासी वर्गातून समाधान
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३१ : वर्षा पर्यटनासाठी मांगेलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झरेबांबर येथे खड्डे पडल्याने प्रवासादरम्यान पर्यटक व ग्रामस्थांना कसरत करावी लागत होती. खड्डे बुजविण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आली; परंतु प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच श्याम नाईक व ग्रामस्थांनी अखेर श्रमदानातून हे खड्डे बुजविले. ठेकेदार सुंदर नाईक यांनीही सहकार्य केले. त्यांच्या या कार्याचे प्रवासी वर्गातून कौतुक करण्यात येत आहे. 
झरेबांबर येथून मांगेलीकडे जाणारा मुख्य रस्ता तब्बल वीस वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. सद्यस्थितीत रस्ता खड्डेमय झाल्याने वाहतुकीस धोकादायक बनला होता. खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. शिवाय खडड्यांतून जाताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
मांगेली वर्षा पर्यटनासाठी याच रस्त्याने पुढे जावे लागते. त्यामुळे सद्या या मार्गावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सर्व स्तरांतून केली जात होती; मात्र रस्ता नक्की कोणत्या विभागाच्या अखत्यारित येतो, असा प्रश्न निर्माण झाल्याने काम रखडले होते. रस्ता कोणत्या विभागाच्या अखत्यारित येतो, हे प्रशासनाला ज्ञात नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग व प्रधानमंत्री ग्रामसडक ह्या दोन्ही विभागांत संभ्रमावस्था निर्माण झाली. या दोन्ही विभागांचे अधिकारी जबाबदारी झटकून हात वर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
संबंधित विभागाने पूर्णतः जबाबदारी झटकल्याने आणि पर्यटकांची वाढती संख्या पाहता सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच श्याम नाईक, ठेकेदार सुंदर नाईक व ग्रामस्थांनी जांभ्या दगडाने खड्डे बुजविले. यासाठी ठेकेदार सुंदर नाईक यांनी चार मजूर उपलब्ध करून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com