मालवण परुळेकर पाणंद काँक्रिटीकरण कामास प्रारंभ

मालवण परुळेकर पाणंद काँक्रिटीकरण कामास प्रारंभ

swt3122.jpg
20183
मालवण : बांगीवाडा परुळेकर गल्ली काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ तुरीबाळा परब यांच्या हस्ते करण्यात आला.

मालवण परुळेकर पाणंद
काँक्रिटीकरण कामास प्रारंभ
शिवसेनेचा पाठपुरावा : स्थानिकांत समाधान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून बांगीवाडा येथील साटम घर ते परुळेकर गल्ली पाणंद काँक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आली. माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून हे काम मार्गी लागले.
नागरिकांच्या मागणीनुसार खोत यांच्या पाठपुराव्यातून मार्च २०२१ मध्ये या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली. प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम मार्गी लागत आहे. सुमारे २२ लाख अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर असलेल्या या कामाबाबत आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे खोत यांनी आभार मानले. ज्येष्ठ नागरिक तुरीबाळा परब यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.
माजी शाखाप्रमुख हनुमंत तोंडवळकर, आबा मेस्त्री, युवतीसेना कुडाळ-मालवण विधानसभाप्रमुख शिल्पा खोत, शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी उपशहरप्रमुख नंदा सारंग, अनिकेत आचरेकर, सुधाकर परब, उमेश परब, एस. के. सावंत, विल्सन फर्नांडिस, शांती तोंडवळकर, दीपा पवार, रजिया शेख, भाग्यश्री फोंडबा, दिया पवार, साक्षी पार्टी, श्वेता पार्टी, पूजा औटी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com