राजापूर ः उघडे गटार ठरतेय नागरिकांसाठी धोकादायक

राजापूर ः उघडे गटार ठरतेय नागरिकांसाठी धोकादायक

rat31p34.jpg ः KOP23M20189 राजापूर ः उघडे असलेले गटार.

उघडे गटार ठरतेय नागरिकांसाठी धोकादायक

राजापूर पोस्टाजवळील रस्ता ; प्रवासी पडल्याच्या घटना उघड

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः शहरातील पोस्ट कार्यालय ते तहसील कार्यालयादरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारामुळे या ठिकाणच्या एसटी थांब्यावर उतरणार्‍या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गटारामध्ये काही प्रवासी यापूर्वी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन हे उघडे गटार बंदिस्त करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
जकातनाका येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या येथून शहरातील जवाहरचौकाकडे येत असलेल्या मुख्य रस्त्यावर पोस्ट ऑफिससह तहसील कार्यालयादरम्यान असलेले गटार उघडे आहे तर, या दरम्यान शहराकडे येणार्‍या एसटी गाड्यांचाही या ठिकाणी थांबा आहे. या थांब्यावर पोस्ट कार्यालयासह तहसील कार्यालय, पोलिस ठाणे येथे कामानिमित्त येणारे विविध गावचे नागरिक गाडीतून उतरत असतात. या मार्गालगतच सांडपाणी वाहून जाणारे गटार असून ते उघडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी बसथांब्यावर उतरणार्‍या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काहीवेळा बसमधून उतरणार्‍या प्रवाशांना या गटाराचा अंदाज येत नसल्याने ते गटारात पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हे गटार उघडे ठेवण्याऐवजी बंदिस्त करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com