कोनशी उपसरपंच, सदस्यासह कार्यकर्त्यांचा ''राष्ट्रवादी''त प्रवेश

कोनशी उपसरपंच, सदस्यासह कार्यकर्त्यांचा ''राष्ट्रवादी''त प्रवेश

swt3124.jpg
20200
कोनशी : येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कोनशी उपसरपंच, सदस्यासह
कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.३१ः तालुक्यातील कोनशी गावचे उपसरपंच अर्जुन सावंत, ग्रामपंचायत सदस्य दीपाली गवस, वैशाली गवस आदी पदाधिकारी व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवत कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-पबर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यामध्ये शरद सावंत, विठ्ठल गवस, गंगाराम नाईक, सिद्धेश गवस, राजन गवस, दिलीप गवस, भरत सावंत, सहदेव सावंत, तानाजी गवस, पायाजी सावंत, न्हानू सावंत, सुभाष गवस, वैष्णवी सावंत, रसिका गवस, वंदना गवस, स्वरा गवस, स्मिता गवस, रंजना नाईक, तनवी गवस, सत्यभामा गवस, समीक्षा सावंत, दीप्ती गवस, सुमित्रा सावंत, सुचिता नाईक, सविता गवस, दीपांजली गवस, रसिका गवस, सुचिता गवस, शुभांगी गवस, उज्ज्वला सावंत, गौरव गवस, भगवान गवस, सुनील सावंत आदींचा सहभाग आहे. यावेळी घारे यांनी, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडले जात आहेत. निश्चितच या सर्वांना अपेक्षित असलेला सावंतवाडी मतदारसंघ घडविण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही दिली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अशिफ शेख, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, शहर चिटणीस राकेश नेवगी, भालावल माजी सरपंच रमेश परब, विनायक सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com