शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या दोडामार्गातील बैठकीत योजनांवर चर्चा

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या 
दोडामार्गातील बैठकीत योजनांवर चर्चा

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या
दोडामार्गातील बैठकीत योजनांवर चर्चा
दोडामार्ग ः येथील शिवसेना कार्यालयात तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्‍यांची बैठक झाली. यात दोडामार्ग शिवसेना कार्यालयामध्ये महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना व लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’चे मार्गदर्शन केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. नीता कविटकर, गणेशप्रसाद गवस, महिला तालुकाप्रमुख चेतन गडेकर, उपजिल्हा संघटक मनीषा गवस, सासोली विभागप्रमुख सान्वी गवस, उपतालुका प्रमुख पूजा देसाई, उपशहर प्रमुख राधिका गडेकर, कोनाळ विभागप्रमुख लक्ष्मी करमळकर, आवाडे शाखाप्रमुख सफोरा शेख, गिरोडे शाखा प्रमुख अनिता गवस, साटेली-भेडशी शाखाप्रमुख शेफाली टोपले, उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, कार्यालय प्रमुख गुरुदास सावंत व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
--
मालवणात सुरक्षारक्षक मानधनापासून वंचित
मालवण ः येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील सुरक्षारक्षक गेले चार महिने मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन मानधन आदा करावे, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सात सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांचे मानधन थकित राहिले होते. त्यावेळी त्यांनी कर्ज घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता. नंतर त्यांचे थकीत मानधन मिळाले; पण आता पुन्हा चार महिने मानधन थकीत राहिले आहे.
--
मालवणात रविवारी विद्यार्थी गुणगौरव
मालवण ः जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ मालवण तालुका शाखेतर्फे तालुक्यातील विद्यार्थी गुणगौरव सोहळा सहा ऑगस्टला मालवण-वायरी येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजिला आहे. तालुक्यातील पाचवी, आठवी, शिष्यवृत्तीधारक, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, पदवीधारक, इंजिनिअर, समाजातील उच्च शिक्षित विद्यार्थी यांचा सत्कार व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सचिव विष्णू चौकेकर यांनी केले आहे.
--
गोळवणात भाजी बियाण्याचे वाटप
मालवण ः गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कृषी विभागामार्फत १०० शेतकऱ्यांना नाचणीचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत भाजी बियाणे कीटचे वाटप करण्यात आले. उपसरपंच गावडे, ग्रामपंचायत सदस्य शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले, ग्रामसेविका शेलटकर, कृषी सहाय्यक सौंगडे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
--
‘आपत्ती’ सामग्रीची वेंगुर्लेत तपासणी
वेंगुर्ले ः आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत असलेले लाईफ बॉय, टॉर्च, स्पीड बोट, लाईफ जॅकेट, कटर्स आदी साधन सामग्रीची तपासणी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केली. नायब तहसीलदार अभिजीत हजारे, पोलिस उपनिरीक्षक वासुदेव परब आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com