पा. एन.डी. पाटील यांची जयंती

पा. एन.डी. पाटील यांची जयंती

२१ (पान ५ साठी, संक्षिप्त)


-rat३१p१८.jpg ः
२३M२०१२६
राजापूर ः मार्गदर्शन करताना प्रा. आकाश चव्हाण.
----------
मराठे महाविद्यालयात प्रा. एन. डी. पाटील यांची जयंती

राजापूर ः स्वतःसाठी न जगता इतरांसाठी अहोरात्र झगडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. एन. डी. पाटील असून, त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. आकाश चव्हाण यांनी केले. या वेळी त्यांनी रयत शिक्षणसंस्थेचे माजी उपाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडून सांगितले. प्रा. पाटील यांची नुकतीच मराठे महाविद्यालयामध्ये जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनशाम हराळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रा. चव्हाण बोलत होते. या वेळी डॉ. हराळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कुलभूषण ससाणे तर आभार डॉ. राजेंद्र बावळे यांनी मानले.
------

वहाळातील गाळ काढल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत

रत्नागिरी ः मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार सुरू असल्याने तालुक्यातील केळ्ये म्हामुरवाडी रस्त्यावर नाखरेकर यांच्या दुकानाजवळील नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. मोरीमध्ये कचरा अडकल्याने नदीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. परिणामी, नागरिकांचे येणे-जाणे बंद झाले तसेच बससेवादेखील बंद झाली. अशा परिस्थितीत म्हामुरवाडी, पवारवाडी, म्हामुरवाडी मोहल्ला येथील ग्रामस्थांनी त्या पाईपमधील गाळ काढण्याचे काम सुरू केले. अशावेळी उद्योजक किरण सामंत यांचे कार्यकर्ते, सरपंच फैयाज मुकादम व‌ मुज्जु मुकादम यांनी स्वखर्चाने जेसीबीची व्यवस्था केली व संपूर्ण रस्ता मोकळा करून त्या पाईप मधील‌ सर्व गाळ काढण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरील सर्व दळणवळण, वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com