भरतीपूर्वी बिंदूनामावली दुरुस्त करा

भरतीपूर्वी बिंदूनामावली दुरुस्त करा

20205
सिंधुदुर्गनगरी : विशाल तनपुरे यांच्याशी चर्चा करताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा समन्वयक अॅड. सुहास सावंत. सोबत अन्य.

भरतीपूर्वी बिंदूनामावली दुरुस्त करा

मराठा महासंघ शिक्षकप्रश्‍नी मागणी; सिंधुदुर्गनगरीत शासनाला निवेदन

ओरोस, ता. ३१ ः जिल्हा परिषद व महापालिकांच्या शिक्षकांच्या बिंदूनामावलीमध्ये घोळ झाला आहे. त्यामुळे संभाव्य शिक्षक भरतीपूर्वी बिंदूनामावली दुरुस्त करून शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, अशी राज्य शासनाकडे मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत, नंदकुमार राणे, स्वामी सावंत, विजय सावंत, अनंत गावकर, प्रदीप गावडे, महेश सावंत, नरेश राऊळ, प्रसाद वारंग, महेश गावडे, एकनाथ कुर्लेकर, संजना राऊळ, लक्ष्मण आंगणे, वैभवी गावडे, राजाराम कविटकर, रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की २०२३ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी त्यांच्या आरक्षित टक्केवारीच्या प्रमाणापेक्षा अतिशय कमी जागा येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू आहे. या तपासणीमध्ये खुल्या प्रवर्गातील बिंदूवर मागास प्रवर्गाच्या बिंदूचे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे बिंदूनामावलीमध्ये अनियमितता होत असल्याने खुल्या व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या जागा अतिशय कमी येत आहेत. त्यामुळे त्या त्या प्रवर्गातील बिंदूचा त्याच प्रवर्गात दाखविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सुरू असलेल्या बिंदू नामावली तपासणीमध्ये निवड प्रवर्ग उपलब्ध नसणे, नियुक्ती आदेश उपलब्ध नसणे, जात पडताळणी दाखला उपलब्ध नसणे, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाची कोणतीही भरती झालेली नसतानाही अनेक जिल्हा परिषदांमध्ये आर्थिक दृष्ट्या मागासच्या बिंदूवर वेगवेगळ्या प्रवर्गात नियुक्त्या झाल्याचे दर्शविले आहे. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दर्शविले आहे. वस्तिशाळा शिक्षकांची नियुक्ती देताना खुल्या प्रवर्गामध्ये दर्शविले आहे. पुरावे नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखविले आहे, या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.
.................
चौकट
आंदोलनाचा इशारा
या प्रकाराची राज्याने तातडीने गंभीर दखल घेऊन लक्ष घालावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे. याचा विचार जिल्हा परिषद, विभागीय मागास वर्ग कक्ष स्तरावर तसेच राज्य शासन पातळीवर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांना निवेदन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com