उद्योजकता लॉन्चपॅड 23 व 24 ला दिल्लीत

उद्योजकता लॉन्चपॅड 23 व 24 ला दिल्लीत

३४ (पान ५ साठी)

उद्योजकता लॉन्चपॅड दिल्लीत

२३ व २४ सप्टेंबरला आयोजन; बिलियनेअर्स ब्लूप्रिंट उपक्रम

खेड, ता. ३१ ः देशातील उद्योजकतेला चालना देण्याच्या आणि त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याच्या उद्देशाने बडा बिझनेस प्रा. द्वारे बिलियनेअर्स ब्लूप्रिंट नावाचा उपक्रम सुरू केला जात आहे. त्या अंतर्गत २३ व २४ सप्टेंबरला दिल्ली येथील श्रीमती इंदिरा गांधी स्टेडियममध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेक सेलिब्रिटींसह २५ हजारापेक्षा जास्त व्यावसायिक यांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा उद्योजकता लॉन्चपॅड कार्यक्रम होणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागींना देशातील आणि जगातील नामांकित अब्जाधीश आणि अव्वल उद्योगपती स्वतःच्या अनुभवातून कौशल्य शिकवतील, अशी माहिती व्यवसाय सल्लागार अनुज जोशी यांनी दिली. खेड येथील मोफत व्यवसाय मार्गदर्शन व सल्लाकेंद्रात आयोजित डिप्लोमा इन इंटरप्रिनियरशिप या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ज्ञानदीप शिक्षणसंस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उद्योजक शमशुद्दीन मुकादम, रोटरी शिक्षण संस्थाध्यक्ष बिपिन पाटणे, उद्योजक श्रीकांत कदम आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिप्लोमा इन इंटरप्रिनियरशिप या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जोशी म्हणाले, दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भारताचे सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, बॉलीवूड अभिनेता उद्योजक विवेक ओबेरॉय, आदरणीय आध्यात्मिक आणि प्रेरक वक्ता जया किशोरी, जी एलए आणि ट्रीवाल विद्यापिठाचे प्रतिनिधी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बिलियनेअर्स ब्लूप्रिंट या कार्यक्रमाचा आरंभ झाला. हा डिप्लोमा कोर्स डॉ. विवेक बिंद्रा, संस्थापक आणि सीईओ बडा बिझनेस यांच्या दूरगामी स्वप्नांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने आरंभ केला जात आहे जो आगामी काळात देशातील उद्योजकतेला एक नवीन आयाम देईल. या कार्यक्रमाची माहिती खेड येथील बिझनेस हेल्प सेंटरमधून सर्वांना मोफत देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com