खेड ग्राहक पंचायत कार्यकारिणीची बैठक उत्साहात

खेड ग्राहक पंचायत कार्यकारिणीची बैठक उत्साहात

पान ५ साठी
......................

खेड ग्राहक पंचायत
कार्यकारिणीची बैठक
खेड, ता. ३१ ः अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या खेड तालुका कार्यकारिणीचे सदस्य व पदाधिकारी यांची मासिक बैठक येथील जिल्हा परिषद विश्रामगृहामध्ये झाली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत सदस्य नोंदणी, कार्यकर्ता अभ्यासवर्ग, सूत्रबंधन कार्यक्रम आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली.
या वेळी कोकण प्रांताचे श्रीकांत चाळके यांची राज्य सरकारच्या कोकण विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. बैठकीत खेड येथील न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणाऱ्या अॅड. स्मिता कदम उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. दिनकर चव्हाण यांची ग्राहक पंचायतीच्या जिल्हा प्रसार आणि प्रचार प्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र बहाल केले.
बैठकीमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक इकबाल फकी, रत्नागिरी जिल्हा प्रसार आणि प्रचार प्रमुख दिनकर चव्हाण, उपाध्यक्ष भूषण काणे, कोषाध्यक्ष सचिन मोरे, सहसचिव अजित तटकरे, सहसंघटक विजय येऊनकर, राजेंद्र दळवी, हेमंत टकले, अॅड. स्मिता कदम, मनीषा दळवी, दिनेश पोपळकर, राहुल कदम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com