बोडदे-खोक्रल रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

बोडदे-खोक्रल रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

swt3128.jpg
M20228
दोडामार्गः बोडदे-खोक्रल रस्त्यावर पडलेले झाड.

बोडदे-खोक्रल रस्त्यावर
झाड पडून वाहतूक ठप्प
दोडामार्ग, ता. ३१ : बोडदे-खोक्रल मार्गावर मोठा वृक्ष कोसळला. या घटनेत विद्युत ताराही तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. विद्युत पुरवठाही खंडित झाला. वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची परवड झाली. तालुक्यात पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली; मात्र आज सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळी बोडदे-खोक्रल रस्त्यावर मोठा वृक्ष विद्युत तारांसहित कोसळला. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. वाहतुकीवरही विपरित परिणाम झाला. संपूर्ण रस्ताच बंद झाल्याने प्रवाशी, शाळकरी मुलांचे हाल झाले. झाड पडल्याची माहिती मिळताच तलाठी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com