लांजा ः संभाजी भिडेंवर कारवाईची मागणी

लांजा ः संभाजी भिडेंवर कारवाईची मागणी

फोटो ओळी
-rat31p39.jpg ःOP23M20229 लांजा ः महाविकास आघाडीच्यावतीने लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देताना पदाधिकारी.

संभाजी भिडेंवर कारवाईची मागणी
लांजा, ता. ३१ ः राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लांजा महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याचे निवेदन तहसीलदारांमार्फत राज्यपाल रमेश बैस यांना सादर करण्यात आले.
हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करणे, हा त्यांचा आवडता विषय आहे. मध्यंतरी त्यांनी १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन नाही व तिरंगा ध्वजाबद्दलसुद्धा अवमानकारक विधान केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असले तरी महाराष्ट्र शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मोहनदास गांधी यांचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमिनदार होते. मोहनदास गांधीजींचे वडील चोरी करून पळून गेले होते. त्यानंतर त्यांच्या आईला मुस्लिम जमिनदाराने पळवले होते. त्यामुळे गांधीजींचे वडील तो जमिनदार होता, असे अतिशय संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर संविधान कलम 153 अंतर्गत कारवाई करून अटक करावी व त्याच्या शिवप्रतिष्ठान या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबा धावणे, दाजी गडहिरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महेश सप्रे, शिवसेना (उबाठा) चे सर्व पदाधिकारी, शहरप्रमुख नागेश कुरूप, युवासेना तालुकाधिकारी प्रसाद माने, शेखर तेंडुलकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com