

23313
कणकवली ः दिक्षांत देशपांडे यांचा सत्कार कराताना संदेश पटेल. शेजारी दिलीप पाटील.
फोंडाघाटमध्ये मतदार नोंदणी, जागृती
विद्यार्थ्यांचे प्रबोधन; कला, वाणिज्य महाविद्यालयात उपक्रम
फोंडाघाट,ता. १८ ः येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये क्रांती दिन, ‘मेरी मिट्टी मेरा देश’ आणि मतदार नोंदणी व जन जागृती शिबिर झाले. सदरचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या एन्. एस. एस. विभागामार्फत झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व डॉ. बालाजी सुरवसे यांनी सांगितले. तसेच ‘मेरी मिट्टी मेरा देश’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना सांगितली. या संकल्पनेद्वारे आपण २०४० सालापर्यंत जगात अग्रेसर असू. या कार्यक्रमास नायब तहसीलदार प्रिया परब प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी मतदार होण्याचे महत्त्व सांगितले. आपल्या देशाची लोकशाही बळकट करायचे असल्यास मतदार सुज्ञ असला पाहिजे. मतदार नोंदणी हे राष्ट्रीय काम आहे. राष्ट्राच्या उभारणीत याच मतदारांचे योगदान मोठे असेल, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन व ऑफलाइन मतदार नोंदणी कशी करायची याची कार्यशाळा घेतली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या संपर्कातील किमान पाच व्यक्ती नवीन मतदान करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे म्हणाले, की खऱ्या अर्थाने लोकसेवा करणारा, समाजात तळागाळात पोचणारा उमेदवार निवडून द्यायचा असेल तर आपण मतदार असले पाहिजे. असे योग्य उमेदवार निवडून दिले तरच आपली व आपल्या समाजाची प्रगती होईल. फोंडाघाटच्या सरपंच संजना आग्रे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधला. जि.प.चे माजी कृषी सभापती संदेश पटेल, डॉ. सतीश कामत यांनीही मार्गदर्शन केले. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत, संचालक राजू पटेल, फोंडाघाटचे तलाठी जयांवार, कर्मचारी पारकर, दिलीप शेळके, अजित कदम, सौ. नारकर, मनोज गव्हाणकर, कौस्तुभ रेडकर, प्रशांत पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.