माडखोलवासीयांचे उपोषण स्थगित

माडखोलवासीयांचे उपोषण स्थगित
Published on

२३७३८
माडखोलवासीयांचे उपोषण स्थगित
सावंतवाडी ः माडखोल येथील धरणाच्या कालवा कामाविरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण स्थगित केले. माडखोल येथील धरणाच्या कालवा कामात अनियमितता झाली असून अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून उपोषण सुरू केले होते. कालवे नादुरुस्त झाल्याने शेती व बागायतीचे नुकसान झाले आहे याकडे केसरकर यांचे लक्ष वेधले. यावेळी मंत्री केसरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
------------
मनसे जनहित कक्षाची लवकरच कार्यकारिणी
सावंतवाडी ः राज ठाकरे यांच्या आदेशाने व राज्य संघटक अ‍ॅड. किशोर शिंदे व सरचिटणीस अ‍ॅड. राकेश पेडणेकर यांच्या सूचनेनुसार मनसे विधी व जनहित कक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारिणी १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. संघटनेत काम करण्याची ज्यांची मानसिक तयारी आहे व ज्यांना समाजकार्याची आवड आहे, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन विधी व जनहित कक्ष जिल्हा संघटक अ‍ॅड. अनिल केसरकर यांनी केले आहे. विधी व जनहित कक्षाच्या माध्यमातून काम करताना पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न योग्य त्या ठिकाणी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com