

23708
कांदळगाव ः विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.
ओझर विद्यामंदिरात गणवेश वाटप
मालवण : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थान आणि परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे ओझर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सचिव संतोष परब यांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष परब, मधुसूदन परब यांनीही मनोगत व्यक्त केले. कांदळगाव देवस्थान मंडळाचे विश्वस्त संजय परब, बाबाजी परब, महादेव परब, प्रभाकर कांदळगावकर, सदानंद कदम आदी उपस्थित होते. पी. के. राणे यांनी आभार मानले.
..............
ओझर विद्यामंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
मालवण : तालुका उत्तर विभाग शिक्षण सहायक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव प्रशालेत स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. कांदळगाव येथील स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत परब यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. माजी मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनी संचिता परब हिने स्वातंत्र्याविषयी मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य सैनिक परब यांनी १९७१ च्या युद्धामधील अनुभवकथन केले. मुख्याध्यापक डी. डी. जाधव व विद्यार्थी अवधूत पारकर, रामचंद्र लाड यांनी संगीत साथ दिली. मयूर ढोलम यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मुलांचा कबड्डी व मुलींचा खो-खोचा सामना झाला. यावेळी जयश्री ढोलम, शेखर राणे, राकेश गावकर आदी उपस्थित होते. प्रवीण पारकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.