पावसाळी कविता वाचनास मळगाव वाचनालयात प्रतिसाद
23806
मळगाव : येथील खानोलकर वाचन मंदिरातर्फे कवियत्री कल्पना बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष हेमंत खानोलकर व अन्य.
मळगाव येथील वाचनालयात
पावसाळी कवितांचे वाचन
सावंतवाडी, ता. १८ ः मळगाव येथील उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरामध्ये ‘स्वरचित पावसाळी कविता वाचन’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रामचंद्र शिरोडकर यांची ‘मिरगवणी’ व नंदा चव्हाण यांची ‘स्त्रीची व्यथा’ या कविता लक्षवेधी ठरल्या. या कार्यक्रमाला कवयित्री कल्पना बांदेकर आणि मळगाव हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीने आणखीच रंगत आली.
खानोलकर वाचन मंदिराच्या या पावसाळी कविता वाचनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शविला. एकाहून एक अशा सरस कवितांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. कवयित्री बांदेकर यांनी कविता कशी सादर करावी, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. वाचनालयाकडून अध्यक्ष हेमंत खानोलकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या बांदेकर यांचा सत्कार झाला. संचालक पृथ्वीराज बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालिका स्नेहा खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले. गुरुनाथ नार्वेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

