मातृत्व आधार फाउंडेशनचा मालवणमध्ये वर्धापन दिन
23857
मालवण ः मातृत्व फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मातृत्व आधार फाउंडेशनचा
मालवणमध्ये वर्धापन दिन
मालवण, ता. १८ : येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन स्वातंत्र्यदिनी वायरी येथील केळबाई मंदिराच्या मंगल कार्यालयात झाला. ज्येष्ठ नागरिक श्रीमती आजगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, पत्रकार शेखर सामंत, फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, वायरी-भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, माजी नगरसेवक मंदार केणी, उद्योजक सागर वाडकर, दशरथ कवटकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर आदी व्यासपीठावर होते. प्रफुल्ल देसाई यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. शहरातील आडवण वायरी, अंगणवाडीतील मृण्मयी जाधव, पार्थ राणे, दुर्वांक गवस, अॅलेक्स फर्नांडिस यांनी वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. सामाजिक कार्यकर्ते मंगेश पराडकर ऊर्फ ढोले बाबू यांना उपचारांसाठी तसेच तांडेल व पाडावे या दोन गरीब कुटुंबाना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभुदास आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय सातार्डेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

