बदलत्या शैक्षणिक धोरणाने अध्यापन निरस

बदलत्या शैक्षणिक धोरणाने अध्यापन निरस

Published on

23862
देवगड ः शिक्षक भारतीच्या स्नेहमेळाव्यात गुणगौरव केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर. (छायाचित्र : एन. पावसकर)

बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे अध्यापन नीरस

संजय वेतुरेकर यांची खंत; ‘शिक्षक भारती’चा देवगडमध्ये स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
देवगड/तळेरे, ता. १८ ः शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे आज वर्गात अध्यापन करताना शिक्षकांना पूर्वीप्रमाणे समाधान मिळत नाही, अशी खंत शिक्षक भारती, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तथा पतपेढी चेअरमन संजय वेतुरेकर यांनी जामसंडे येथील स्नेहमेळाव्यात व्यक्त केली.
शिक्षक भारती, देवगडचा स्नेहमेळावा श्रीराम मोरेश्वर माध्यमिक विद्यालय, जामसंडेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वेतुरेकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, जिल्हा संघटक आकाश पारकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, संचालक सुरेंद्र लांबुरे, सत्यपाल लाडगावकर, शरद देसाई, प्रदीप सावंत, स्वप्नील पाटील, कणकवली तालुकाध्यक्ष प्रसाद मसूरकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष कांबळे, सुनील घस्ती, राजेश वाळके, देवगड तालुका क्रीडा समन्वयक उत्तेरश्वर लाड, छात्रभारती राज्य अध्यक्ष रोहित ढाले, सचिव सचिन बनसोडे व देवगड तालुकाध्यक्ष हेमंत सावंत, सचिव संजय खोचरे आदी उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याच्या प्रारंभी माता सरस्वती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुकाध्यक्ष सावंत यांनी स्वागत केले. सत्यपाल लाडगावकर यांनी प्रास्ताविकात तालुका शिक्षक भारतीच्या कार्याचा आढावा घेतला. नूतन संचालकांसह देवगड तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेख कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, देवगड तालुका शिक्षक भारतीतर्फे तालुक्यातील सुमारे ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. नितीन गावकर व रुपेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. आकाश पारकर यांनी आभार मानले.
---
...म्हणून निवडणुकीत सहज विजय!
नूतन संचालक सुरेंद्र लांबुरे, प्रदीप सावंत व नाईक यांनी शिक्षक भारतीमुळेच पतपेढीच्या निवडणुकीत सहज विजय मिळवू शकलो, अशी कबुली देत देवगड तालुका शिक्षक भारतीचे कौतुक केले. जिल्हा कार्याध्यक्ष आडेलकर यांनी संघटनेतील नेतृत्वाला संघर्षाची धार असल्याने संघटना जिल्ह्यात अग्रस्थानी असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com