कपाटातील गुदमरलेल्या पुस्तकांना श्वास द्या

कपाटातील गुदमरलेल्या पुस्तकांना श्वास द्या

Published on

23929
फोंडाघाट ः येथील महाविद्यातील कार्यक्रमात बोलताना डॉ. सतीश कामत.

कपाटातील गुदमरलेल्या पुस्तकांना श्वास द्या

डॉ. कामत; फोंडाघाट येथे ग्रंथालय दिन उत्साहात

फोंडाघाट,ता. १७ ः मोबाईलच्या जगात पुस्तके गुदमरू लागली आहेत. सर्वच पुस्तके मोबाईलमध्ये सापडतात. त्यामुळे मोबाईल हा सर्वव्यापी झाला आणि त्यामुळेच माणूस व्यापला आहे. अर्थात मोबाईल मधील वाचन हे चांगले वाचन होऊ शकत नाही. पुस्तकांच्या पानांचा आनंद त्यात निश्चित नसतो. हल्ली पुस्तके कपाटात गुदमरायला लागली की काय? असे वाटायला लागले. या गुदमरणाऱ्या पुस्तकांचा श्वास मोकळा करण्याची गरज आहे. आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी ग्रंथालयात जातो ही समाधानाची बाब आहे; परंतु जे अजिबातच जात नाहीत. त्यांनाही ग्रंथालयाची गोडी लावणे आवश्यक आहे. वाचनीय पिढीच समाज परिवर्तन करू शकते. हाच इतिहास आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी केले.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे ग्रंथालय दिन झाला. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्त्व कळावे, मोबाईलमध्ये पूर्णपणे अडकलेली तरुण पिढी थोडी तरी पुस्तकात यावी याच हेतूने हा उपक्रम ग्रंथालय विभागामार्फत घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथपाल डॉ. विद्या मोदी यांनी या दिनाचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या, ग्रंथालयाचे जनक श्रीरंगनाथन होते; मात्र त्यापूर्वी ग्रंथालये नव्हती, असे नाही. त्यावेळी ग्रंथालये ही बंदिस्त होती. राजा महाराजांपुरती मर्यादित होती. शिक्षित समाजच कमी होता. त्यामुळे पुस्तके ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती. प्रतिष्ठितांची जहागीरी पुस्तकांवर होती. श्रीरंगनाथन यांनी ही ग्रंथालय सार्वजनिक केली. कोणतीही पुस्तके सर्व समावेशक पद्धतीने समाजाच्या हाती लागली पाहिजेत याची काळजी घेतली. याचाच परिणाम म्हणून आज ग्रंथालय चळवळ उभी राहिली. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालयही विविध पुस्तकांनी समृद्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. विद्यार्थी वाचता झाला तर तो लिहिता होईल आणि लिहिता विद्यार्थी सज्ञान होईल. यानिमित्ताने दयेश मेजरी या विद्यार्थ्यांने श्रीरंगनाथन यांच्या संपूर्ण कार्याची माहिती दिली. लक्ष्मी पाटकर हिने सूत्रसंचालन केले. शुभम लाड याने आभार मानले.

--
सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com