दाभोळ-सुयोग वैद्य यांचे उपोषण अखेर स्थगित

दाभोळ-सुयोग वैद्य यांचे उपोषण अखेर स्थगित
Published on

\
फोटो ओळी
-rat१७p३१.jpg ः KOP२३M२३९३२ दापोली ः सुयोग वैद्य यांना उपोषण सोडण्यासाठी पत्र देताना उपविभागीय अभियंता कदम.


सुयोग वैद्य यांचे उपोषण अखेर स्थगित
दाभोळ, ता.१८ ः दापोली तालुक्यातील राज्यमार्ग ९७ मधील मळे वारेबुवा ते ते गुडघे या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने हे काम करणारे ठेकेदार राहुल कन्स्ट्रक्शन, खेड यांना काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी उसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुयोग वैद्य यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण सुरू केले होते. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता कदम यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही, चिखलगाव येथील अवघड वळणावर रस्त्याला भेग गेलेली आहे, या ठेकेदाराचा समावेश काळ्या यादीत करण्यात यावा, असे आदेश आमदार योगेश कदम यांनी आमसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असतानाही त्यावर कार्यवाही करण्यात आली नसल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे. तसे निवेदनही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या वेळी वैद्य यांना पत्र देण्यात आले असून त्यात मळे वारेबुवा ते गुडघे या रस्त्यातील नूतनीकरणाचे काम वेळीच पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम वेळेत पूर्ण न केल्याने निविदा सूचनेतील शर्तीप्रमाणे ठेकेदारांना दंड करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला असून, ठेकेदारावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com