27 पक्षांचा नवा गट मोदी सरकारला टक्कर देईल

27 पक्षांचा नवा गट मोदी सरकारला टक्कर देईल
Published on

३० (पान ३ साठी)

नवा गट सरकारला टक्कर देईल

विनायक राऊत ; नगरपालिका निवडणुकीत निर्विवाद विजय

चिपळूण, ता. १८ ः इंडिया हा २७ पक्षांचा नवा गट केंद्रातील मोदी सरकारला जोरदार टक्कर देईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
चिपळूण शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी नुकतेच आपल्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला. ते एकनथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर चिपळूण शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची बैठक आज चिपळूण शहरातील चितळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत, राजू देवळेकर, रूमा देवळेकर, मानसी भोसले आदी उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना खासदार राऊत म्हणाले, चिपळूणमधून किती गेले किती राहिले हे तपासण्यासाठी नव्हे तर आपल्या पक्षाच्या नियमित उपक्रम, कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आजची बैठक आहे. जे कुणी गेले ते गेले. अनेक दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे आज ना उद्या हे होणार होते; मात्र इथे कसलीही चिंता नाही. हे गर्दीने फुलून गेलेले सभागृह इथली शिवसेना भक्कम असल्याची साक्ष देत आहे. आपल्या भाषणात त्यांनी मणिपूर, लोकसभेतील पंतप्रधानांची उपस्थिती, भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. इंडिया हा 27 पक्षांचा नवा गट केंद्रातील एनडीएला येणाऱ्या काळात जोरदार टक्कर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद विजय मिळवून देऊ, असेही त्यांनी शहराला आश्वस्त केले. राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली.

कुणी कितीही आव्हानं देऊ द्या..
याप्रसंगी आमदार भास्कर जाधव म्हणाले, कुणी आल्या गेल्याची चिंता करू नका. कुणी कितीही आव्हानं देऊ द्या. खासदार म्हणून तुम्हाला पुन्हा निवडून आणूच; पण रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही आमदार निवडून आणू,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com