कणकवली विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण

कणकवली विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण
Published on

kan177.jpg
3M23870
कणकवली : शहरातील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये राष्‍ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
------------
कणकवली विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण
कणकवली, ता. १८ : शहरातील विद्यामंदिर हायस्कूलमधील राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण सेना योजना आणि स्वच्छता विभाग यांच्यावतीने हायस्कूल परिसरात वृक्षारोप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. बी. जाधव आणि प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात जांभूळ, काजू, आवळा, चिंच आदी वृक्षरोपांची लागवड केली. यावेळी मुख्याध्यापक कांबळे यांनी लागवड केलेल्‍या रोपांचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले. तर सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी बेलेवलकर यांनी वृक्षांचे वैज्ञानिक उपयोग सांगितले. याप्रसंगी वनक्षेत्रपाल इंदुलकर व श्रीमती शेवाळे उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रसाद राणे, संदीप नागभीडकर, विद्या शिरसाट, ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com