भगवती देवस्थान समितीतर्फे
मुणगेत विद्यार्थी गुणगौरव

भगवती देवस्थान समितीतर्फे मुणगेत विद्यार्थी गुणगौरव

Published on

24047
मुणगे ः गुणवंत विद्यार्थ्यांसह देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, दिलीप महाजन, निषाद परुळेकर, सरपंच साक्षी गुरव, गजानन राणे, गौरी तवटे आदी मान्यवर. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

भगवती देवस्थान समितीतर्फे
मुणगेत विद्यार्थी गुणगौरव
मुणगे, ता. १७ ः येथील देवी भगवती देवस्थान समिती, मुणगेतर्फे गावातील सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. व्यासपीठावर मुणगे सरपंच साक्षी गुरव, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, भगवती एज्युकेशन, सोसायटीचे व्यवस्थापक देवदत्त ऊर्फ आबा पुजारे, पंच सदस्य प्रमोद सावंत, देवस्थान समिती विश्वस्त प्रकाश सावंत, लब्देवाडी शाळेचे मुख्याध्यापक गजानन राणे, भगवती हायस्कूलचे शिक्षक प्रतिनिधी गौरी तवटे, विश्वस्त पुरुषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकर, आनंद घाडी, अनिल धुवाळी, लेखनिक रामतीर्थ कारेकर, पत्रकार झुंझार पेडणेकर, विश्वास मुणगेकर, दिगंबर पेडणेकर, सुरेश बोरकर, पोलिसपाटील साक्षी सावंत उपस्थित होते. गजानन राणे यांनी देवस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मुणगे शाळा नं. १ चे मुख्याध्यापक विशाल खडसे, मुणगे नं. २ चे मुख्याध्यापक नंदकुमार सोनटक्के, आपवाडी शाळेचे मुख्याध्यापक गणेश खरात, सडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष राठोड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com