मंडणगडचा अडलेला विकास मार्ग सुकर करणार
१६ (टुडे पान २ साठी)
- rat१८p७.jpg ः
P२३M२४११८
मंडणगड ः पत्रकार संघाचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांचा पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
----------
मंडणगडचा विकास मार्ग सुकर करणार
खासदार सुनील तटकरे ; देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेला उपस्थिती
मंडणगड, ता. १८ ः मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच आग्रही असतो. मंडणगड तालुक्याचा अडलेला विकासाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता नेहमीच पाठपुरावा करत आहे. तालुक्याच्या प्रश्नांवर नेहमीच विधायक भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आहेत. भविष्यातही असेच प्रयत्न राहणार आहेत, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी भिंगळोली येथे केले.
यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण सभागृहात पत्रकार संघाच्यावतीने आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा व गौरव सोहळ्यावेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, संदीप राजपुरे, भाई पोस्टुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. या वेळी तटकरे म्हणाले, संविधानाने या देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकारांबरोबर जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. सर्वांना समान न्यायाच्या तत्त्वाने या देशाचा कारभार चालतो. नैमित्तिक जीवन जगत असताना विकासाइतकीच देशाचे हित व महत्वाचे आहे. युवापिढीने देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाने लोकशाही पद्धतीचा अंगीकार करून विकासाकडे केलेली वाटचाल समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. युवा पिढीने देशाचा इतिहास, लोकशाही समजून घेतली पाहीजे, तसेच युवा पिढीमध्ये देशभक्तीची भावना जिवंत ठेवण्यासाठी मंडणगड तालुक्यातील पत्रकारांनी गेली दोन वर्षे सुरू केलेला हा देशभक्ती वाढवणारा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही सांगितले. या कार्यक्रमाचे निमित्त साधून पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार यांच्या हस्ते खासदार तटकरे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमित्त साधून क्रीडाशिक्षक प्रवीण भुवड यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

