चिपळुणात फोटोफेअर 2023 चे आयोजन
२० (टुडे पान २ साठी)
चिपळुणात ‘फोटोफेअर’ उत्साहात
जागतिक छायाचित्रण दिन ; रत्नागिरी, चिपळुण फोटोग्राफर्स असोसिएशन
चिपळूण, ता. १८ ः रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन व चिपळूण तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. १७) चिपळूण कापसाळ येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने फोटोफेअर २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर बांधवांसाठी हा कार्यक्रम खुला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम, चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले. दीपप्रज्वलन व कॅमेरापूजन झाल्यावर कार्यक्रमाची सुरवात झाली. उद्घाटनप्रसंगी शेखर निकम यांनी फोटोग्राफर व त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, मोबाईलवर फोटो काढणे आणि फोटोग्राफरने कॅमेऱ्याद्वारे फोटो काढणे यात मोठा फरक आहे. फोटोग्राफर होण्यासाठी तुमच्या अंगी प्रचंड पेशन्स हवेत. यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी लागते. फोटोफेअरमध्ये विविध प्रकारचे अल्बम, फ्रेम्स, सॉफ्टवेअर्स आणि फोटोसंबंधित साहित्याची विक्री, तसेच या संबंधित माहिती देणारे वेगवेगळे स्टॉल्स हे फोटोग्राफर्सचे आकर्षण ठरले. याचबरोबर मुंबईचे नामवंत परीक्षक पराग शिंदे यांची कार्यशाळा विशेष उल्लेखनीय ठरली. फोटोफेअरमध्ये संजय शिंदे आणि कांचन मालगुंडकर यांनी शेखर निकम यांचे स्वागत केले. गुरू चौगुले व प्रवीण पाटोळे यांनी शिंगटेंचे स्वागत केले. यानंतर सर्व तालुका प्रतिनिधींचे स्वागत चिपळूण तालुका असोसिएशन सदस्यांनी केले. स्टॉलधारकांचे स्वागत सर्व सदस्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

