

१५ (टुडे पान २ साठी)
-rat१८p६.jpg ः
२३M२४११७
खेड ः मुंबई लोकलमधील साकारलेला संविधान डबा.
----------
स्वातंत्र्यदिनी साकारला ‘संविधान रेल डब्बा’
खेडचे आमिर काझींचा पुढाकार ; मध्य रेल्वेचे सहकार्य
खेड, ता. १८ ः भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला या वर्षी ७३ वर्षे पूर्ण झाली आणि २०२५ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होतील. या निमित्ताने संवेदना फेलोशिप प्राप्त खेडमधील आमिर काझी या तरुणाच्या पुढाकाराने मुंबईतील मुंबई सेंट्रल लाईनवरील लोकलमध्ये संविधान डबा साकारला आहे.
संवेदना फेलोशिपअंतर्गत मध्य रेल्वे, मुंबईच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर लोकलच्या एका डब्ब्याचे रूपांतर संविधान रेल्वे डब्बा म्हणून करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच या कामी आशयपूर्ण पोस्टर्स आणि त्यासाठीच्या आर्थिक सहयोगासाठी तयारी दर्शवली. हा प्रस्ताव मुंबई विभागाचे अरमिंदर सिंग यांनी स्वीकारला. १५ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील श्यामसुंदर महाराज यांच्या हस्ते संविधान रेल्वे डब्याचे उद्घाटन करण्यात आले. या डब्यात संविधान सभा, संविधानाची निर्मिती, संवैधानिक मूल्ये, मूलभूत हक्क, कर्तव्ये, संतांचे विचार व संविधान सभेतले फोटो या बाबतच्या माहितीचे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये चित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मुल्ये सोप्या पद्धतीने नागरिकांना समजतील अशी रचना केली आहे. ज्यातून त्यांना आपली राज्यघटना जाणून घेणे सोपे बनले आहे. कुर्ला कारशेडचे वरिष्ठ अधिकारी रामेंद्र राय आणि संवेदना फेलोशिप टीम यांचे विशेष सहकार्य लाभले. मुंबई सेंट्रल लाईनवरील लोकल ट्रेन क्र. ५३४५B मध्ये लेडीज कोचच्या पुढील व इंजिनपासून दुसरा डबा हा संविधान रेल डबा आहे आणि १५ ऑगस्टपासून तो सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. संविधान साक्षरता वाढवण्याच्या महत्वपूर्ण कामासाठी संविधान प्रचारक आमिर काझी, पुकार आणि संबंधित रेल्वे अधिकारी यांनी घेतलेला हा पुढाकार अभिनंदनीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.