गीतगायन स्पर्धा
३१ (टुडे पान २ साठी)
नवजीवन हायस्कूलमध्ये गीतगायन स्पर्धा
खेड ः तालुक्यातील शिवबुद्रुक येथील नवजीवन हायस्कूल येथे नुकतेच क्रांतिदिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतील मुलामुलींच्या विविध गटांनी सहभाग घेतला. प्रथम क्र. आठवीमध्ये लव माय कंट्री ग्रुप, द्वितीय क्र. (दहावी) सौंदर्या जुवळे ग्रुप-ऐ देश मेरे, तृतीय क्र. संघवी इनरकर ग्रुप-ऐ देश मेरे, उत्तेजनार्थ तनवी तांबे ग्रुप-तेरी मिट्टी मे मिल जाओ, सिद्धी करजावकर ग्रुप-सलाम उन शहिदों को या संपूर्ण कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षक आय्युब मुतवल्ली, जावेद आजरेकर, स्नेहल मानके, दादासाहेब मुजावर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन समीर किरतकर यांनी केले. नियोजनानुसार सर्व तयारी भरत गावडे, महेंद्र धोत्रे, विमल वारंगडे यांनी केली. या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक इसहाक मणेर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात इसहाक मणेर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

