

२५ (टुडे पान २ साठी)
- rat१८p३२.jpg ः
२३M२४१५७
चिपळूण ः शाळेत मान्यवरांचे स्वागत करताना एल.के. शिंदे
---------
शिंदे विद्यालयास मोफत डीजिटल साहित्य
पॅसिफिक लाईन्सचा पुढाकार ; दर्जेदार शाळांना साहित्याचे वितरण
चिपळूण, ता. १८ ः तालुक्यातील ओवळी-नांदीवसे येथील राजाराम राघोजीराव शिंदे माध्यमिक विद्यालयास पॅसिफिक इंटरनॅशनल लाईन्स कंपनीकडून मोफत डीजिटल साहित्य देण्यात आले. ही शिपिंग क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीने सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण तालुक्यातील अनेक दर्जेदार शाळांना विविध प्रकारच्या डीजिटल साहित्याचे वितरण केले.
विद्यालयाच्या विद्यार्थी सभागृहात आयोजित कार्यक्रमाला शाळा समितीचे चेअरमन लक्ष्मण शिंदे, संजय गुजराल, तृप्ती कुंदर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. डिजिटल बोर्ड, कॉम्प्युटर, ई-लर्निंग सेट, डिजिटल टीव्ही, स्कूलबॅग व अन्य शैक्षणिक साहित्यांचा समावेश आहे. शाळा व पीआयएल कंपनी यांच्यात दुवा म्हणून काम करणाऱ्या अशोकराव शिंदे, अजितराव शिंदे व दिनेशराव शिंदे यांचा विशेष सत्कार केला. मुख्याध्यापक रामचंद्र आरेकर यांनी शाळेचा इतिहास आणि डीजिटल साहित्याची शाळेला असणारी गरज याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रकाश शिंदे, संतोष शिंदे, नंदकुमार शिंदे, भरत शिंदे, दीपक शिंदे, सुदेश शिंदे, संतोष शिंदे, किशोर आंब्रे, संतोष चव्हाण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.