कुडाळात आज छायाचित्र प्रदर्शन
कुडाळमध्ये आज
छायाचित्र प्रदर्शन
कुडाळ ः येथील भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफी यांच्यातर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त १९ ते २१ ऑगस्टदरम्यान कुडाळ येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (ता. १९) सकाळी साडेदहाला या प्रदर्शनाचे उद्घाटन सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट कॉलेजचे प्रा. प्रकाश पेठे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि फोटोग्राफर डॉ. रुपेश धुरी उपस्थित राहणार आहेत. भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफी, आशीर्वाद भवन, पोस्ट कार्यालयाजवळ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संचालक भूषण जडये व आर्या जडये यांनी केले आहे.
--
पत्रकारांच्या पाल्यांचा
तळेरेत आज गौरव
तळेरे : इंडियन जर्नालिस्ट युनियन, नवी दिल्ली आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रतर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी, बारावी व पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा गुणगौरव समारंभ उद्या (ता. १९) येथील श्रावणी कॉम्प्युटर सेंटरच्या हॉलमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांची नावे पत्रकार संजय खानविलकर (तळेरे) यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन युनियनचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश साटम यांनी केले आहे. युनियनचे राष्ट्रीय सचिव आणि प्रदेशाध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे.
...................
नवोदय विद्यालयात
सहावीसाठी प्रवेश
सावंतवाडी ः शिक्षा मंत्रालय, भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी प्रवेश अर्ज ‘ऑनलाइन’ भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडाद्वारा प्राप्त झाली आहे. या प्रवेशाची सर्व माहिती https://navodaya.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्टपर्यंत होती, ती वाढून २५ पर्यंत केली आहे. त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन प्राचार्य एम. के. जगदीश यांनी केले.
--
तळेरे येथे आज
मार्गदर्शन शिबिर
तळेरे : तळेरे-खारेपाटण विभागीय भाजपतर्फे जिल्हा परिषद विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गासाठी शासकीय पद भरती प्रक्रिया मार्गदर्शन व सहाय्य शिबिराचे आयोजन उद्या (ता. १७) सकाळी दहा ते बारा दरम्यान तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयात केले आहे. शिबिरास मार्गदर्शक म्हणून गुरुकुल प्रा. एस. जी. ढोनुकसे व प्रा. बी. एस. जांभेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी सभापती रवींद्र ऊर्फ बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे आदी उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

