गतवर्षीपेक्षा 400 मिलीमिटर कमी पाऊस

गतवर्षीपेक्षा 400 मिलीमिटर कमी पाऊस
Published on

फोटो ओळी
-rat१८p४३.jpg- KOP२३M२४१९० डुगवे (ता. रत्नागिरी) ः डुगवे परिसरात तरारलेली भातशेती.
(सुधीर विश्वासराव ः सकाळ छायाचित्रसेवा)


गतवर्षीपेक्षा ४०० मिलिमीटर कमी पाऊस

ऑगस्ट महिन्यातील स्थिती ; भातशेतीवर करप्याचा धोका

रत्नागिरी, ता. १८ ः जून महिन्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील जिल्ह्यातील पावसाची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत ४०० मिमी घटलेली आहे. सलग दोन दिवस सकाळच्या सत्रात हलका पाऊस झाला, दिवसभर पुन्हा कडकडीत उन पडले.
जिल्ह्यात १ जून ते १८ ऑगस्टपर्यंत सरासरी २३९४ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत २७९२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर कायम होता. मात्र यंदा जुलै महिना वगळता जून आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात पावसाने पाठच फिरवली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात २९५८ मिमी, तर सर्वात कमी पाऊस रत्नागिरी १७३६ आणि गुहागर १७३९ मिमी इतका पडला आहे. मंडणगड- २८५८, खेड- २०४४, चिपळूण- २६९२, संगमेश्‍वर- २४३३, लांजा- २६०६, राजापूर- २४३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर गुरुवारी सकाळी हलक्या सरींना सुरवात झाली होती. सकाळच्या सत्रात पाऊस होता. परंतु दुपारी कडकडीत उन पडले. शुक्रवारीही सकाळी एक सर पडून गेली. पुन्हा दिवसभर कडकडीत उन पडले. श्रावणधारांऐवजी कडकडीत उन पडत आहे. कडकडीत उन्हामुळे भातशेतीमध्ये करप्याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कातळावरील भातशेतीमध्ये पाणीच नसल्याने जमीनीला भेगा पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

चौकट
आठवडयात चिंताजनक स्थिती
अनियमित पावसाचा परिणाम भातशेतीवर पाहायला मिळत आहेत. अधूनमधून पडणारी सर भातशेतीला सध्या पुरेशी आहे. परंतु अजून आठवडाभर असेच वातावरण राहिल्यास चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते. याला शिरगाव भातसंशोधन केंद्राचे संशोधक व्ही. व्ही. दळवी यांनीही दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com