बांधकाम क्षेत्रातील बदल आत्मसात करा
24208
बांधकाम क्षेत्रातील
बदल आत्मसात करा
प्राची घोलप ः कुडाळ येथे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः बांधकाम क्षेत्रात येणारे नवनवीन बदल आत्मसात केले पाहिजेत. स्पर्धात्मक युगात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून वाटचाल करावी, असे प्रतिपादन मुद्रांक जिल्हाधिकारी प्राची घोलप यांनी क्रिडाई, सिंधुदुर्ग आयोजित एक दिवसीय सेमिनारमध्ये केले.
क्रिडाई सिंधुदुर्गच्या वतीने महारेरा, जीएसटी ई रजिस्ट्रेशनबाबत एक दिवसीय सेमीनारचे आयोजन केले होते. याचे उ्दघाटन श्रीमती घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी मनीष जाधव, दिलीप पाटील, संकेत शहा, क्रिडाई अध्यक्ष गजानन कांदळगावकर, नीरज देसाई, अभिषेक देशमुख, अभिजित जैतापकर, अनिल साखळकर, संजय पिंगुळकर, अभय वालावलकर, माजी अध्यक्ष प्रकाश जैतापकर, विजय प्रभू, अमोल शिरसाट, सनदी लेखापाल अमोल खानोलकर, श्रीमती नायर, सागर तेली, शंतनु पिंगुळकर, ब्रीजेश कोठावळे, तन्मय माळगावकर, सारस्वत बँकेचे कुडाळ शाखाधिकारी ठाकूर, जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिक आदी उपस्थित होते.
श्री. कांदळगावकर म्हणाले, ‘‘रिअल इस्टेट बांधकाम व्यवसाय म्हटला की आपल्याला अनेक वेगवेगळ्या नियमांना बांधील राहून काम करावे लागते. या नियमात नेहमी नवनवीन बदल होत असतात. या बदलांबाबत माहिती असणे हे यशस्वी उद्योगजकासाठी अत्यंत गरजेचे आहे. अशाच आपल्या क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांबरोबर आपल्या माहितीत भर टाकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.’’
यावेळी गेली दहा वर्षे क्रिडाई अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे प्रकाश जैतापकर यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अभय वालावलकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

