

फोटो ओळी
-rat१८p३.jpg-KOP२३M२४११४ रत्नागिरी : गीता मंडळात स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथीनिमित्त पूजा करताना मंडळाचे सदस्य.
गीता मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी
रत्नागिरी ः येथील गीताभवन मंडळातर्फे मंगळवारी स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. या वेळी स्वामींची षोड्शोपचारे पूजा करण्यात आली. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सुभाष भडभडे यांनी ध्वज फडकवला. यावेळी मंडळाचे कार्यवाह अॅड. मिलिंद पिलणकर, व्यवस्थापक संदेश कीर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळी
-rat१८p१३.jpg ःKOP२३M२४१२६ चिखलगाव ः तयार करण्यात आलेली चांद्रयानाची प्रतिकृती.
चिखलगावमध्ये चांद्रयानाची प्रतिकृती
दाभोळ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगतेच्या निमित्ताने व नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान तीनच्या उड्डाणाचे औचित्य साधून लोकसाधना चिखलगाव येथे इस्रो अशी थीम घेऊन विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी इस्रोचा इतिहास, चंद्रयान एक-दोन व तीन तसेच मंगळ मोहीम अशा अनेक विषयांवर मुलांना सविस्तर माहिती दिली. सगळ्यात आकर्षण ठरले ते अंतराळवीराच्या अवकाशातून अवतरण्याचे तसेच चंद्रयान तीनच्या प्रतिकृतीच्या उड्डाणाच्या आविष्काराचे. खऱ्या अर्थाने मुलांना हा एक वेगळा अनुभव मिळाला. अवकाश संशोधन या विषयातील भविष्यातील संधी या विषयाचा अभ्यास या विषयी उत्सुकता निर्माण झाली.
फोटो ओळी
-rat१८p१४.jpg ःKOP२३M२४१२७ पंचनदी ः पथनाट्य सादर करताना विद्यार्थिनी.
कृषीच्या विद्यार्थिनींनी केले पथनाट्य
दाभोळ ः दापोली कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ''आझादी का अमृत महोत्सव'' आणि ''आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त ''millet क्रांती'' या विषयांवर पथनाट्य सादर करून उपस्थितीत प्रेक्षकांना ''आझादी'' या शब्दाचे महत्व पटवून भारताच्या शक्तीचे आणि यशाचे सादरीकरण केले. भरडधान्य मानवी जीवनात शरीर सुदृढ होण्यासाठी किती आवश्यक आहेत तसेच त्यांची लागवड करणे ही सहजशक्य आहे हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. निर्मल ग्रुप ग्रामपंचायत पंचनदी आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या परिसरात हे पथनाट्य सादर करण्यात आले.
कोळथरेत बियाण्यांविषयी मार्गदर्शन
दाभोळ ः दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थिनींच्या अग्रिकास गटाने कोळथरे गावातील गणपती मंदिरात बियाण्यांविषयी मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकात विद्यार्थिनींनी बियाणांचे प्रकार, लेबल, सीड टॅगविषयी महिती दिली. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी तसेच विविध प्रकारचे सीड टॅग व टॅगविषयी माहिती दिली. विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना बीजोत्पदन व पाळावयाचे नियम या विषयांवर माहिती दिली. या प्रात्यक्षिकासाठी कोळथरे परिसरातील २० शेतकरी तसेच ५ विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यामध्ये वैभवी पाटील, हृत्विका कांबळे, वैष्णवी झिंजे, वैष्णवी बुक्कम आणि रिद्धी घरत यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.