

नांगरणीत गावठी गटात जयसांबा अव्वल
लांजा ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवासेनेच्या रिंगणे शाखेतर्फे रिंगणे येथे आयोजित राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत गावठी गटात देवरूख पाटगाव येथील जयसांबा तर खिलार बैलगटात लांजा तालुक्यातील भांबेड येथील सुनील कांबळे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तालुक्यातील रिंगणे येथे झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेंतर्गत गावठी बैलजोडी प्रकारात पाटगाव येथील जयसांबा प्रथम, द्वितीय आदिष्टी कृपा गोविळ, ता. लांजा, तृतीय पंकज पवार -ताम्हाणे. प्रथम विजेत्याला 8 हजार रुपये व ढाल, द्वितीय विजेत्याला 5 हजार . व ढाल आणि तृतीय क्रमांकाला तीन हजार व ढाल असे पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे खिलार बैलजोडी प्रकारात प्रथम भांबेड येथील सुनील कांबळे, द्वितीय यश पराडकर -रायपाटण आणि तृतीय चंद्रकांत पांचाळ - झर्ये यांच्या बैलजोडीने पटकावला. प्रथम विजेत्या स्पर्धकाला 8 हजार रुपये. व ढाल, द्वितीय क्रमांकाला 5 हजार व ढाल आणि तृतीय विजेत्याला 3 हजार रुपये व ढाल असे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
भडगांव-खोंडे ग्रामपंचायतीच्या
सरपंचपदी दीपक पदुमले
खेड ः भडगाव-खोंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपक पदुमले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भडगाव-खोंडे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नुकत्याच पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली आहे. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खेड तहसीलच्या महसूल नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी यांनी काम पाहिले. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती
अरुण कदम, माजी सभापती सुरेश उसरे, अपर्णा नक्षे, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी सरपंच प्रमोद बैकर, उपसरपंच महेंद्र सावंत, माजी सरपंच अमर उसरे, अनिल नक्षे , प्रसाद शिगवण, संदीप घरवी, महेश जगदाळे, भडगांव शाखाप्रमुख किरण डफळे, ग्रामसेविका मिनाक्षी वाजे , सर्व सदस्य उपस्थित होते.
माने अभियांत्रिकीचा रौप्य महोत्सव
साडवली ः आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांचा यावर्षी 65वा वाढदिवस असल्याने हा दिवस महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या देदिप्यमान कामगिरीचा व मागील 25 वर्षातील यशस्वी वाटचालीचा आढावा प्राचार्य महेश भागवत यांनी व्यक्त करून 25 वर्षातील माहिती दिली. कोकणातील विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून रवींद्र माने यांनी 1998 ला हे महाविद्यालय उभे केले. या महाविद्यालयाचे आज वटवृक्षात रूपांतर होताना माने यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले असून ही बाब आमच्यासाठी गौरवाचीच आहे, असे मत प्राचार्य महेश भागवत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, सचिव चंद्रकांत यादव, दिलीप जाधव, प्रद्युम्न माने, प्रा. नितीन भोपळे उपस्थित होते.
फोटो ओळी
-rat18p34.jpg ःKOP23M24169 प्रांजल गुरव
पैसाफंडची प्रांजल गुरव वक्तृत्व स्पर्धेत तिसरी
संगमेश्वर ः व्यापारी पैसाफंड संस्था संचलित पैसाफंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरची विद्यार्थिनी प्रांजल गुरव हिने माखजन इंग्लिश स्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. भरडधान्य ः उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम या विषयावर प्रांजलने सहा मिनिटांच्या वेळेत आपले मत मांडले. प्रांजल हिला विज्ञानशिक्षिका अर्चिता कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.