संक्षिप्त

संक्षिप्त
Published on

सद्भावना दिनी अधिकाऱ्यांनी घेतली शपथ
रत्नागिरी ः माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सद्भावना दिवसानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी साठे यांनी सर्वांना शपथ दिली. या वेळी विशेष भूसंपादन अधिकारी निशा कांबळे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी हणमंत म्हेत्रे, तहसीलदार ज्योती वाघ, तेजस्विनी पाटील आदींसह अन्य शाखांमधील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
----

फोटो ओळी
-rat18p9.jpg ः KOP23M24120 राजापूर ः मुंबई येथे स्नेहमेळाव्याला उपस्थीत राजापूर हायस्कूल सन 90-91 दहावी बॅचचे विद्यार्थी.

राजापूर हायस्कूलचा मुंबईत स्नेहमेळावा उत्साहात

राजापूर ः राजापूर हायस्कूलच्या सन 90-91 दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि पाल्यांचा गुणगौरव सोहळा प्रकाश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच फोर्ट मुंबई येथे शालेय आठवणींना उजाळा देत उत्साहात झाला. माजी विद्यार्थी सज्जाद मापारी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संतोष हातणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दहावी, बारावी, पदवी तसेच विविध परीक्षांत प्रावीण्य मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. साहिल बाईत, आकांक्षा नार्वेकर, प्रणय दळवी, शुभम कदम, तृप्ती लोळगे आणि श्रृती दिलीप पोवार या चिमुकलीने आपल्या सवंगड्यांवरील कवितेने आणि देशभक्तीपर गीताने सर्वाची मन जिंकली. या कार्यक्रमाला नयना इनामदार, स्वप्ना शिवलकर, मनिषा धुळप, गीता मांडवकर उपस्थित होते.

फोटो ओळी
-rat18p30.jpg ः 3M24149 राजापूर ः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देताना अंबिकेश्‍ववर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मान्यवर.

चुनाकोळवणमध्ये शालेय साहित्य वाटप
राजापूर ः तालुक्यातील चुनाकोळवण येथील अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. या वेळी अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मटकर, प्रतीक मटकर, चंद्रकांत जानस्कर, मधुकर मटकर, संजय पाटणकर, संजय मटकर, वासुदेव राऊत उपस्थित होते. दहावी, बारावी परीक्षेमध्ये सुयश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धांमध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी सन्मानचिन्ह आणि आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.


फोटो ओळी
-rat18p31.jpg ःKOP23M24150 राजापूर ः विजेत्या साई विमलेश्‍वर, ओणी संघाला आकर्षक चषक आणि बक्षिस देऊन गौरवताना मान्यवर.

कबड्डी स्पर्धेत ओणीचा साई विमलेश्वर संघ विजेता
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील श्री वडचाई व्यायामशाळा व क्रीडा प्रसारक मंडळ आणि राजापूर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत ओणीच्या साई विमलेश्‍वर संघाने विजेतेपद पटकावले. पन्हळे संघाला उपविजेतेपद मिळाले. गावमर्यादित लहान गट स्पर्धेमध्ये जिजामाता अ संघ विजेता ठरला. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले. समारंभाला रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण, उपसरपंच विजय जड्यार, विनायक लिंगायत, बाळा शेट्ये आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com