

swt1817.jpg
24209
रियाज खान
बांद्यात क्रीडा संकुल होणे गरजेचे
रियाज खानः राऊळ यांची भूमिका योग्यच
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ः बांदा व दशक्रोशीला उत्तुंग क्रीडा परंपरा आहे. त्यामुळे शहरात क्रीडा संकुल होणे ही काळाची गरज आहे. भाजपसोबत आमचे राजकीय मतभेद आहेतच. मात्र, क्रीडा संकुलच्या प्रश्नावर आमची भूमिका ही माजी सभापती शीतल राऊळ यांच्यासोबत नेहमीच राहील, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडी अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी दिली आहे.
दीपक केसरकर हे मंत्री असून ते सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी बांदावासियांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला डावलणे हे निषेधार्ह आहे. केसरकर यांना बांदा दशक्रोशीतील जनतेने भरघोस मतधिक्क्याने निवडून दिले आहे, हे केसरकर सोईस्करपणे विसरत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ते केवळ सावंतवाडी शहराचे आमदार आहेत का? असा खोचक प्रश्नही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. क्रीडा संकुलच्या प्रश्नासाठी आम्ही देखील रस्त्यावर उतरून लढाई देण्यासाठी तयार आहोत.
श्री. राऊळ यांच्या उपोषणवेळी बांदा शहरात तालुका क्रीडा संकुल झाल्यास याचा फायदा शहरातील तसेच दशक्रोशीतील नवोदित खेळाडूंना होणार आहे. पुढील युवा पिढी निश्चितच विविध क्रीडा प्रकारात राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. केसरकर हे केवळ आपमतलबी राजकारण करत असून त्यांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. केसरकर यांच्या विजयात बांदा दाहक्रोशीतील मताधिक्य आहे. केसरकर केवळ मतांसाठी बांदावासियांशी गोड बोलत होते हे आता सिद्ध झाले आहे. परंतु, येथील जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांना मतदानातून नक्कीच उत्तर देतील, असेही खान यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.